शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘अटल महापणन’मध्ये अरुण काकडे राज्यात नंबर वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:16 IST

राज्य सरकारने राबविलेल्या ‘अटल महापणन अभियान २०१६-१७’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात नंबर वनची कामगिरी केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

ठळक मुद्दे‘अटल महापणन’मध्ये अरुण काकडे राज्यात नंबर वनसहकारमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव : प्रदीप मालगावे यांचाही सन्मान

कोल्हापूर : राज्य सरकारने राबविलेल्या ‘अटल महापणन अभियान २०१६-१७’ मध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात नंबर वनची कामगिरी केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरवण्यात आले.राज्यातील विकास संस्था, खरेदी-विक्री संघांच्या बळकटीकरणासाठी ‘अटल महापणन अभियान’ राबविण्यात आले होते. प्रत्येक जिल्हा उपनिबंधकांवर याची जबाबदारी दिली होती. संस्थांनी पीक कर्ज वाटप, खत विक्रीसह इतर व्यवसाय सुरू करून स्वत:चे उत्पन्न वाढविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.

जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी यामध्ये झोकून देऊन काम करीत अनेक संस्थांना विविध उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहित केले. शासकीय व बॅकिंग पातळीवर येणाऱ्या अडचणींमध्ये त्यांनी मदत केल्याने राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचे उत्कृष्ट काम झाले आहे. त्याची दखल राज्य सरकारने घेतली असून, सोमवारी सोलापुरात झालेल्या एका कार्यक्रमात अरुण काकडे यांना सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

त्याचबरोबर जिल्हास्तरीय पातळीवर शिरोळचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनाही मंत्री देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्याचबरोबर चंदगड व आजरा खरेदी-विक्री संघ, श्रीराम विकास (कसबा बावडा), कोथळी विकास (शिरोळ), शेडसाळ विकास (शिरोळ) या संस्थांचाही गौरव करण्यात आला. यावेळी अटल महापणनचे गणेश शिंदे, पणन मंडळाचे योगेश मस्के, अप्पर निबंधक सुनील पवार, शैलेश कोतमिरे, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त साबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर