शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैय्याकुमार यांच्या सभेला परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:42 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार याच्या सायंकाळी दसरा चौकात होणाऱ्या जाहीर सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

ठळक मुद्देकन्हैय्याकुमार यांच्या सभेला परवानगी नाकारलीकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेचे कारण

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा सहावा स्मृतिदिन शनिवारी होत आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कार्यक्रमांचे एकाच ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. मात्र, आता डाव्या संघटनांचा युवा आक्रमक चेहरा असलेला कन्हैयाकुमार याच्या सायंकाळी दसरा चौकात होणाऱ्या जाहीर सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.पोलिसांनी बुधवारी या सभेस परवानगी दिल्यावर घाईगडबडीत पत्रकार परिषद घेऊन ही सभा दसरा चौकात उघड्यावर होणार असल्याची माहिती गिरीश फोंडे यांनी दिली होती. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते, तर आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे, माजी आमदार मालोजीराजे, जेएनयूमधील विद्यार्थी नेत्या अमृता पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.आता कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात रोग प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कन्है्य्याकुमारच्या सभेला परवानगी नाकारली आहे. ही सभा दसरौ चौक मैदान येथे उघड्यावर मैदानात घेण्यात येत असल्याने याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेचे कारण देउन या सभेला परवानगी नाकारली असून ती बंदिस्त जागेत आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.दरम्यान, श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने दिलीप पवार, एस. बी. पाटील, व्यंकाप्पा भोसले, प्रा. उदय नारकर, मेघा पानसरे, रसिया पडळकर यांनी पुढाकार घेऊन एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविशकुमार यांचे ऑनलाईन व्याख्यान नियोजित वेळेत होणार आहे. त्याची घोषणा अगोदरच झाली आहे.भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध या विषयावर ते व्याख्यान देतील. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा कार्यक्रम ६ ते ८ या वेळेत आहे. शाहू स्मारक भवनमध्ये त्याचे लोकांसाठी थेट प्रक्षेपणही आयोजित केले आहे. रविशकुमार ६ ते ७ अशी एक तास मांडणी करणार आहेत.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारkolhapurकोल्हापूर