शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबचा कमलजित कुस्तीवीर

By admin | Updated: January 9, 2017 01:14 IST

हितेश काला पराभूत : डॉ. डी.वाय.पाटील ट्रस्टच्या वतीने आयोजन, किरण भगतची स्वरुप सिंहवर मात

कोल्हापूर : पंजाबचा ‘भारतकेसरी’ कमलजित सिंहने तितक्याच तोलामोलाच्या हरियाणाच्या ‘हिंदकेसरी’ हितेश काला याला एकलांगी स्वारी डावावर अस्मान दाखवीत डॉ. डी. वाय. पाटील कुस्तीवीर किताबाची चांदी गदा पटकावली. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या किरण भगतने घिस्सा डावावर हरियाणाचा भारतकेसरी स्वरूप सिंह याच्यावर मात करीत कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली. विजेत्या भारतकेसरी कमलजितसिंहला बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, श्रीमंत शाहू महाराज, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, के. पी. पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, डॉ. संजय डी. पाटील, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, आदींच्या उपस्थितीत चांदीची गदा व किताब प्रदान करण्यात आला. राजर्षी शाहू कुस्त्यांचे मैदान येथे रविवारी डॉ. डी. वाय पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आयोजित केलेल्या या लढतीत १९४ हून अधिक लहान-मोठ्या कुस्त्या झाल्या. दुपारी दोन वाजता सुरू झालेले मैदान रात्री नऊ वाजता संपले. नूतनीकरणानंतर प्रथमच मैदान खचाखच भरले होते. पंजाबच्या धुमछडी आखाडयांचा भारत केसरी कमलजित सिंह व हरियाणा येथील धर्मवीर आखाडयाचा हिंदकेसरी हितेश काला यांच्यामध्ये मुख्य लढत रात्री ८.०३ वाजता सुरू झालेली कुस्ती तब्बल ४६ मिनिटे सुरु होती. यात कमलजितने प्रथम ठेप लावून हितेशला चितपट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून हितेशने आपली सुटका करून घेतली. यानंतर पुन्हा कमलजितने डूब काढून हितेशला एकेरी पट काढून खाली घेतले. त्यातूनही हितेशने सुटका करून घेतली. कमलजितने झोळी डावावर हितेशला चितपट करण्याचा प्रयत्न केला. पंच संभाजी वरुटे यांनी दोघांना कुस्ती निकाली करण्याची सूचना दिली. कमलजितने हितेशला पुन्हा घुटना डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून हितेश सहीसलामत सुटला. अखेर ८.४९ वाजता कमलजितने हितेश काला याला हप्ता डाव टाकला. त्यातून सुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या हितेशला पुन्हा कमलजितने एकलांगी स्वारी डाव टाकून चितपट केले. (प्रतिनिधी)‘हिंदकेसरी’ होणारच...कोल्हापुरात आज कुस्ती पाहण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी उपस्थित आहेत, हे पाहून मी भारावून गेलो आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे मी नक्कीच ‘हिंदकेसरी’ होईल, अशी भावना ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी व्यक्त केली. परदेशी पाहुण्यांची उपस्थितीजर्मन नागरिक कॉन्स्टीन व त्यांची पत्नी इरिना हे भारत फिरण्यासाठी आले आहेत. त्यांनी शतकोत्तर शाहू कुस्त्यांच्या मैदानास भेट दिली. यावेळी सुरू असलेल्या कुस्त्या पाहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यांनी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मैदानात हजेरी लावली. यावेळी संयोजकांनी कॉन्स्टीन यांच्या हस्ते ६० किलो गटातील एक कुस्ती लावली. ‘खासबाग’मध्ये आता दररोज घुमणार शड्डूखासबाग हे कुस्तीपटूंसाठी ऊर्जास्थान आहे. महानगरपालिकेच्या वतीने खासबाग मैदान मल्लांना सराव करण्यासाठी आता दररोज सकाळी व सायंकाळी खुले ठेवण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांनासुद्धा कोल्हापुरातील कुस्ती पाहण्याची संधी मिळणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मुलींच्याही लढती लक्षणीयया मैदानात पाच महिला कुस्तीवीरांच्या कुस्त्याही लावण्यात आल्या. शिंगणापूर कुस्ती केंद्राची सोनाली मंडलिक हिने अनुष्का भाट हिला गुणावर हरविले. दुसऱ्या कुस्तीत मुरगूड येथील मंडलिक कुस्ती केंद्राच्या सृष्टी भोसले हिने पट्टणकोडोलीच्या विनया पुजारी हिला गुणावर हरविले. तिसऱ्या कुस्तीत शिंगणापूरच्या दिशा कारंडे हिने सांगलीच्या संजना बागडीला सिंगल लेन्सनर डावावर चितपट केले. शिंगणापूर शाळेची राष्ट्रीय महिला कुस्तीगीर विश्रांती पाटीलने मुरगूडच्या मंडलिक कुस्ती केंद्राच्या अंकिता शिंदेला अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले.े.