शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:25 IST

उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देकलिंगडे, लिंबूच्या मागणीत वाढ, भाजीपाल्याच्या दरात घसरण पांढरा वाटाणा मात्र चढाच

कोल्हापूर : उष्मा वाढू लागल्याने कलिंगडे, काकडी व लिंबूच्या मागणीत वाढ झाली आहे. कलिंगडांची आवक अद्याप कमी असल्याने दर काहीसे चढेच राहिले आहेत. किरकोळ बाजारात ३० पासून ५० रुपयांपर्यंत दर राहिला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दहा रुपयांना बुट्टीभर मिळणारे लिंबू आता दहा रुपयाला तीन मिळू लागले आहेत.फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडी जाणवत होती, मात्र गेली चार-पाच दिवस उष्मा वाढत आहे. त्यामुळे शीतपेये, फळांची मागणी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे कलिंगडांना मागणी असताना आवक त्या प्रमाणात नाही. हिरव्या पाटीची कलिंगडे अद्याप दिसत नाहीत.

काळ्या पाटीची कलिंगडे बाजारात आली असून, ३० ते ५० रुपये एका कलिंगडाचा दर आहे. स्थानिक काकडीची आवक वाढली असून, ४० रुपये किलो दर आहे. त्याशिवाय द्राक्षे, सफरचंद, चिक्कू, संत्र्यांची आवक चांगली आहे. द्राक्षाची आवक तुलनात्मक वाढली असली तरी गोडीला कमी असल्याने उठाव होताना दिसत नाही. किरकोळ बाजारात ८० ते १०० किलो दर राहिला आहे.उन्हाचा तडाका वाढत असला तरी भाजीपाल्याच्या दरात घसरण दिसत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दरात किलो मागे पाच ते दहा रुपये कमी झाले आहेत. स्थानिकच्या भाजीपाल्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.

हिरवागार एक किलो कोबीचा गड्डा दहा रुपये, वांगी २० रुपये किलो आहे. ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचा दर किलोमागे पाच ते दहा रुपयांनी कमी झाले आहेत. कोथिंबिरीची पेंढी १० रुपये झाली असून, मेथी, पालक, पोकळ्याचा दर स्थिर आहे.तूरडाळ व हरभरा डाळीच्या दरात काहीशी घसरण झाली असून, किलोमागे सरासरी दहा रुपये कमी झाले आहेत. इतर डाळींचे दर कायम असले तरी पांढरा वाटाण्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सरकी तेल, शेंगदाणा, शाबू आदींचे दर स्थिर राहिले आहेत. कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाले असून, घाऊक बाजारात सरासरी १५ रुपये, बटाटा १८ रुपये, तर लसूण १४० रुपये किलो राहिला आहे.

टोमॅटो पुन्हा मातीमोल!मध्यंतरी टोमॅटोचा दर काहीसा वधारला होता. मात्र या आठवड्यात तो पुन्हा घसरला आहे. घाऊक बाजारात २ ते ५ रुपये दर असून, किरकोळ बाजारात दहा रुपयाला सव्वा किलो टोमॅटो आहे.

‘ब्याडगी’, ‘गंटुर’ तेजीतलाल मिरचीचा हंगाम सुरू झाला असून, दर चांगलाच तेजीत आहे. ‘ब्याडगी’, ‘गंटुर’ला आपल्याकडे मागणी अधिक असते. त्याचे दर अनुक्रमे प्रतिकिलो २४० व १८० रुपये आहे. सध्या कर्नाटकातून मिरचीची आवक सुरू असून, आंध्रप्रदेशमधून आवक सुरू झाल्यानंतर दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर