शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कळे पोलीस ठाण्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 9, 2015 23:59 IST

मुहूर्त सापडेना : ५४ गावांच्या सुरक्षेसह तक्रारींसाठी ७० ते ८० किलोमीटरची फरफट थांबवण्याची मागणी

सरदार काळे - कळे -कळे (ता. पन्हाळा) येथील नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यासंदर्भात चार महिन्यांपूर्वी अधिसूचना निघाली असूनही ते सुरू करण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पोलीस ठाण्याच्या इमारतीसह सर्व बाबींची पूर्तता झालेली असतानाही ते अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी याबाबत विशेष लक्ष घालून विभागातील सुमारे ५४ गावांच्या सुरक्षेसह तक्रारींसाठी पन्हाळा येथे ७० ते ८० किलोमीटरवर फरफटत जाण्याचा वनवास संपवावा, अशी मागणी कळे विभागातील सामान्य जनतेतून होत आहे.कळे हे पश्चिम पन्हाळ्यातील केंद्रस्थ गाव आहे. या ठिकाणी १९५४ पासून दूरक्षेत्र पोलीस चौकी आहे. या पोेलीस चौकीशी पन्हाळा पश्चिम भागासह धामणी खोरा व डोंगराळ भागातील ५४ गावे, २२ वाड्या जोडलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कळे गाव हे अतिमहत्त्वाचे असून, या केंद्रापासून काही गावे सुमारे ६५ कि.मी.वर आहेत. वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचे प्रमाण दुर्गम व डोंगराळ भाग आणि जवळून जाणारे दोन राज्यमार्ग यांचा विचार केल्यास कळे येथे पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींचे प्रयत्न, जनतेच्या मागण्या आणि वृत्तपत्रांतून अनेकवेळा दाखवून दिलेली गरज, याचा विचार करून कळे येथील स्वतंत्र पोलीस ठाण्याला २०१२ साली शासनाकडून तत्वत: मंजुरी मिळाली. २०१३ मध्ये याबाबत शासन निर्णय झाला. सप्टेंबर २०१४ मध्ये याबाबत शासन अधिसूचनाही निघाली; पण अद्याप कळे येथे पोलीस ठाणे सुरू झालेले नाही.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, नवीन पोलीस ठाण्यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुखांशी चर्चा करून लवकरात लवकर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने योग्य ती कार्यवाही पूर्ण केली जाईल, असे सांगितले होते; पण या घोषणांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.पोलीस ठाण्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा या राज्यमार्गालगतच सुमारे दहा हजार चौ. फु. क्षेत्राची सुसज्ज भाड्याची इमारत आहे. या इमारतीत पोलीस कोठडी, अधिकारी व ठाणे अंमलदार केबीन, संगणक व वायरलेस कक्ष, गोपनीय विभाग, क्राईम व बारनिशी विभाग, कारकून विभाग, आदींची सोय होण्याइतपत खोल्या आहेत. तसेच आवश्यक फर्निचरही आहे. शिवाय कोकण विभागाकडे लक्ष ठेवण्याचे हे मोक्याचे ठिकाण आहे. अशा सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या इमारतीस पोलीस ठाण्याचा दर्जा मिळावा व आवश्यक ती कर्मचारी संख्या उपलब्ध व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.कळे परिसरात काही गावे संवेदनशील आहेत. वाढती गुन्हेगारी, वाहतूक सुरक्षा, अवैध धंदे यांच्यावर आळा बसण्यासाठी पश्चिम पन्हाळा विभागात कळे येथे पोलीस ठाणे लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे.- मारुती गुरव, गावकामगार पोलीसपाटील, सावर्डे तर्फ असंडोली.