शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘राधानगरी’त काजवा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:38 IST

राधानगरी : निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या राधानगरी अभयारण्यात निसर्गाचा आणखी एक लखलखता आविष्कार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येथील राधानगरी नेचर क्लबच्यावतीने फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात २६ मे रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानमेव्याचा आस्वादही घेता येणार आहे. क्लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, शशांक लिंग्रस, अनिल ...

राधानगरी : निसर्गसंपदेचा खजिना असलेल्या राधानगरी अभयारण्यात निसर्गाचा आणखी एक लखलखता आविष्कार अनुभवण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. येथील राधानगरी नेचर क्लबच्यावतीने फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात २६ मे रोजी काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रानमेव्याचा आस्वादही घेता येणार आहे. क्लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, शशांक लिंग्रस, अनिल चव्हाण यांनीही माहिती दिली.विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, दुर्मीळ वनस्पती यांची रेलचेल असलेल्या या अभयारण्याचे निसर्गप्रेमी, अभ्यासक, पर्यटक व सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण असते. जून ते आॅक्टोबर हा पावसाचा काळ वगळता अन्य काळात येथे हजारो पर्यटक भेट देतात. प्रचंड पाऊस, खळाळणारे पाणी, धुके, धरणांतील विस्तृत पाणीसाठा, फेसाळणारे धबधबे यातून निसर्गाचे खरे रूप या परिसरात नजरेस पडते. पावसाळ्यानंतर सर्वत्र हिरवाईने नटलेल्या निसर्गाचे मनमोहक दृश्य खिळवून ठेवते. उन्हाळ्यात होणाऱ्या पानगळीनंतर एका बाजूला रखरखता उन्हाळा, तर दुसºया बाजूला कोवळ्या पालवीचे अंकुर पाहणाºयांच्या मनाला गारवा देऊन जातात.या काळातच जंगल रात्रीच्या वेळी उजळून निघते. चमकणाºया काजव्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर फिरत असतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. या दृश्याचा अनोखा अनुभव घेण्याची संधी या महोत्सवात निसर्गप्रेमींना मिळणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाला सुरुवात होईल. काळम्मावाडी धरण मार्गावरील फराळे येथील अंबाबाई मंदिर परिसरात मुख्य कार्यक्रम होईल. शिवाय आसनगाव धनगरवाडा परिसरातील जंगलातही भ्रमंती करून याचा अनुभव घेता येणार आहे.ग्रामस्थांच्या सहभागातून आयोजनराधानगरी वन्यजीव विभाग, राजापूर व फराळे येथील स्थानिक परिस्थिकीय समिती, ग्रामस्थांच्या सहभागातून राधानगरी नेचर क्लबने याचे आयोजन केले आहे. यामध्ये अल्पोपाहार, एक वेळचे शाकाहारी जेवण, आंबा, काजू, करवंदे, फणस यासारख्या रानमेव्यांचा आस्वाद घेता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाला बाटलीबंद शुद्ध मध भेट देण्यात येणार आहे.