शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कडुबाई खरात यांच्या घरासाठी कागलकरांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:43 IST

कागल : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची गाणी गात लोकप्रबोधन करणाऱ्या कडुबाई खरात ...

कागल : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांची गाणी गात लोकप्रबोधन करणाऱ्या कडुबाई खरात यांना घर बांधून देण्यासाठी राजर्षी शाहूंची जनक भूमी असलेले कागलकर पुढाकार घेत आहेत. ही बाब महत्त्वाची आहे. राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचा वारस म्हणून कडुबार्इंचे घर पूर्ण करण्यासाठी हवे ते सहकार्य करू, अशी ग्वाही पुणे म्हाडाचे अध्यक्ष, छ. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.येथील आर.पी.आय.च्या (आठवले गट) कार्यकर्त्यांनी घरबांधणीसाठी भेटवस्तू योजना राबविली आहे. या माध्यमातून हा निधी उभारणार आहोत. याचा प्रारंभ समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे होते. कडुबाई खरात यांचे घर औरंगाबाद महानगरपालिकेने अतिक्रमण मोहिमेत पाडल्यामुळे त्या बेघर झाल्या आहेत. येथील एका हॉटेलच्या मिनी सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कडुबाई खरात यांनी गीते सादर केली.समरजितसिहं घाटगे म्हणाले की, कडुबाई खरातसारख्या भगिनी समाज प्रबोधनासाठी नि:स्वार्थपणे काम करतात. आपण एक जागरूक समाज म्हणून त्यांच्या घरासाठी पुढाकार घेऊया. उत्तम कांबळे म्हणाले की, शाहू महाराजांच्या भूमीतून लोकसहभागातून कडुबार्इंना औरंगाबादमध्ये घर बांधून देणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला समतेचा संदेश देण्यासारखे आहे.यावेळी ‘स्मॅक’चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, राज्य सचिव मंगलराव माळगे, बाळासाहेब वाशीकर, चंद्रशेखर कोरे, ‘गोशिमा’चे अध्यक्ष लक्ष्मीचंद पटेल यांचीही भाषणे झाली. यावेळी नंदाताई भास्कर, जयपाल कांबळे, राजेंद्र ठिपकुर्लीकर, विश्वास सरुडकर, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, गुणवंत नागटिळे, विनोद कांबळे, सचिन मोहिते, मनोज गाडेकर, आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष बाबासाहेब कागलकर यांनी स्वागत, बी. आर. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. आण्णासो आवळे यांनी आभार मानले.