कोल्हापूर: शास्त्रीनगर मैदानावर कोल्हापूर जिल्हा क्रिक्रेट असोसिएशन आयोजित कै. बाबा भोसले करंडक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात कागल तालुका क्रिकेट असोसिएशन ‘ब’ ने फायटर्स स्पोर्टस् क्लबवर ४ गडी राखून विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना फायटर्स स्पोर्टस् क्लबने २८.१ षटकांत सर्वबाद १२६ धावा केल्या. त्यामध्ये हर्षल बोरसे ३१, प्रवीण लोंढे २५, सम्राट घोरपडे १६, महादेव पाटील ११ धावा केल्या. गोलंदाजी करताना कागल तालुका क्रिकेट असोसिएशन ‘ब’कडून मोहसीन नायकवडीने ४, लखन मकवाना व विशाल जमनिक यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना कागल तालुका क्रिकेट असोसिएशन ‘ब’ ने १९४ षटकांत ६ बाद १६५धावा केल्या. त्यामध्ये अनिल सावंत अमरदीप बरगे ३४, फिरोज नगारजी २६, शिवदास पडवळे, राहुल चौगुले १४ व योगेश पाटील १३ धावा केल्या. गोलंदाजी करताना फायटर्स स्पोर्टस् क्लबकडून अर्षद पठाण व राजू पठाण यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. अशाप्रकारे कागल तालुका क्रिकेट असोसिएशन ‘ब’ने ४ विकेटनी विजय मिळविला.
कागल तालुका क्रिकेट असोसिएशन विजयी
By admin | Updated: April 30, 2015 00:22 IST