शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कागलने ‘श्रावणबाळ’ला तारले..काट्याची लढत.उत्तूर विभागाने तारले

By admin | Updated: October 20, 2014 00:41 IST

कार्यकर्ते व सर्वसामान्यांच्यामुळे विजय..दोन्ही बाजूने गुलालाची उधळण...हालसिद्धनाथाच्या दर्शनाला...

जहॉंगिर शेख, दत्ता पाटील - कागल --विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी ५९३४ मतांनी शिवसेनेचे उमेदवार संजय आनंदराव घाटगे यांच्यावर मात क रीत सलग चौथ्यांदा आमदारकी शाबूत ठेवली. हसन मुश्रीफ यांना १ लाख २३ हजार ६२३ मते, तर संजय घाटगे यांना १ लाख १७ हजार ६९२ मते मिळाली. इतर उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार परशुराम तावरे यांनी ५५११ मते मिळवली, तर राष्ट्रीय कॉँग्रेसचे संतान बारदेस्कर १०३४, मनसेचे अजित मोडेकर ७८१, तर नोटाचा उपयोग ८४७ मतदारांनी केला. येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीला पोस्टाची २३७७ मते मोजण्यात आली. पोस्टाच्या मतांमध्ये मुश्रीफ यांना १४०३, तर घाटगे यांना ९७४ मते मिळाली. पहिल्या फेरीपासून हसन मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांच्यावर आघाडी घेतली होती. चौथ्या फेरीत ही आघाडी ५८८५ मतापर्यंत पोहोचली. या आघाडीत कागल शहरातील मतांचा समावेश होता. त्यानंतर ही आघाडी खाली येऊ लागली. आठव्या फेरीत २१००, तर पुन्हा बोरवडे भागामुळे ही आघाडी ३५१४ वर जाऊन पोहोचली. तेराव्या फेरीत ही आघाडी ५५० पर्यंत, तर चौदाव्या फेरीत २३४ पर्यंत ही आघाडी खाली आली. सेनापती कापशी विभागाच्या मतमोजणीने कागल तालुक्याची मतमोजणी पूर्ण झाली. तेव्हा कागल तालुक्यातून हसन मुश्रीफ केवळ १७२ मतांनी आघाडीवर होते. तोपर्यंत १८वी फेरी झाली होती. उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाल्यानंतर हे चित्र बदलले. मुश्रीफ यांनी १९ व्या, २० व्या फेरी दरम्यान ५९७१ इतकी आघाडी घेतली. शेवटी गडहिंग्लज-कडगांव परिसराची मतमोजणी सुरू झाली. यावेळी मताधिक्य चारशे-पाचशेने खाली येत अखेर मुश्रीफ यांना साडेपाच हजारांची अंतिम आघाडी मिळून विजयावर शिक्कामोर्तब झाले. प्रत्येक आघाडीनिहाय मतांचे आकडे बाहेर येत होते. मुश्रीफसमर्थक अलका शेती फॉर्मजवळ, तर संजय घाटगे समर्थक गहिनीनाथनगर जवळ थांबले होते. स्वत: हसन मुश्रीफ हे खर्डेकर चौकातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यालयात थांबले होते. शेवटच्या फेरीपर्यंत विजय इकडे-तिकडे होत असल्याने समर्थकांची द्विधा मन:स्थिती होत होती. निकालानंतर मुश्रीफ समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला. कागल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून हसन मुश्रीफ यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे संचालक रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील, नवीद मुश्रीफ, भैया माने, युवराज पाटील, आदी सहभागी झाले. निपाणी वेस येथे या मिरवणुकीचे विजयी सभेत रूपांतर झाले. समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागलच्या जनतेने पुन्हा एकदा जातीय व धार्मिक प्रचाराला या भूमीत थारा नाही, हे दाखवून दिले आहे. रणजितसिंह पाटील म्हणाले, हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीचा विजय आहे. विजयी उमेदवार मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांनी हाडाची काडे, रक्ताचे पाणी करून हा विजय मिळविला आहे. विक्रमसिंहजी घाटगे, रणजितसिंह पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनीही अपार कष्ट केले आहेत. विरोधकांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन जातीयवादी प्रचार केला. मात्र, सर्वसामान्य जनतेने त्यांना दाद दिली नाही. सलग चौथ्यांदा आमदार होण्याचे भाग्य मला लाभले आहे. भविष्यातील राजकारणात विरोधकांच्या या कुटील जातीयवादी राजकारणाला कशा पद्धतीने उत्तर द्यावे, याबद्दल विचार केला जाईल.कार्यकर्ते व सर्वसामान्यांच्यामुळे विजयसामान्य गोरगरीब जनता, माझ्या माता-भगिंनी आणि तरुणांच्या मतामुळे मी विजयी झालो आहे. माझ्या विजयात ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील आणि माझ्या कार्यकर्त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. विशेषत: उत्तूर-गडहिंग्लज व इतर ठिकाणच्या गावांनी मला मताधिक्य दिले. विरोधकांनी कधी नाही इतका विषारी जातीयवादी प्रचार केल्याने मला मताधिक्य कमी मिळाले. - हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉँग्रेस काट्याची लढतही निवडणूक हसन मुश्रीफ, विक्रमसिंह घाटगे, मुरगूडकर पाटील विरुद्ध संजय घाटगे, सदाशिवराव मंडलिक अशी राजकीय विभागणी झाली. कागल तालुक्यात यामुळे काट्याची लढत झाली. कागल तालुक्यातील मतांची विभागणी अवघ्या दीड-दोनशे मतांच्या फरकाने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.उत्तूर विभागाने तारलेउत्तूर जिल्हापरिषद मतदारसंघातून मुश्रीफांना सहा हजारांची आघाडी मिळाल्याने तेथेच त्यांचा विजय निश्चित झाला. कारण संजय घाटगे हे गडहिंग्लज शहर किंवा कडगाव जिल्ह्यामध्ये इतके मताधिक्य तोडू शकत नव्हते. गडहिंग्लज शहरातूनही घाटगे यांना अपेक्षित मताधिक्य मिळालेले नाही. त्यामुळे उत्तूर विभागानेच मुश्रीफांना तारले.दोन्ही बाजूने गुलालाची उधळण...विविध फेऱ्यात मुश्रीफ-घाटगे यांच्यात कमी-जास्त मते होत होती. अफवाही जोरात पसरत होत्या. त्यामुळे सुरुवातीला संजय घाटगे गटाच्या समर्थकांनी गुलालाची उधळण सुरू केली होती, तर शेवटच्या फेरीनंतर हसन मुश्रीफ समर्थकांनी गुलालाची उधळण केली.हसन मुश्रीफांचा विक्रम...सलग तीनवेळा निवडून येण्याचा बहुमान यापूर्वी सदाशिवराव मंडलिक आणि हसन मुश्रीफ यांनी मिळविला होता. मात्र, या निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी होऊन हसन मुश्रीफ यांनी एक प्रकारे विक्रम केला.पोस्टाच्या मतांबद्दल उत्सुकता मतमोजणीपूर्वी कागल शहरात पोस्टाच्या मतांबद्दल झालेल्या वादाचे सावट सकाळी मतमोजणीवर होते. निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावर कोणताही निर्णय जाहीर न करता थेट मतमोजणीस प्रारंभ केला. निवडणुकीच्या निकालाच्या उत्सुकतेत हा विषयही बाजूला पडला. ५९० मतांबद्दल हा वाद झाला होता. हालसिद्धनाथाच्या दर्शनाला... शेवटची फेरी पूर्ण झाल्यानंतर मुश्रीफांचा विजय निश्चित झाला. कार्यकर्ते त्यांची प्रतीक्षा करीत होते. मात्र, मुश्रीफ हे निकाल कळल्यानंतर थेट हालसिद्धनाथाच्या दर्शनाला गेले.पाच वर्षांत मते वाढविणार गटा-तटाच्या राजकारणात भाजपचा उमेदवार म्हणून मला मिळालेली पाच हजारांवर मते खूप चांगली आहेत. येत्या पाच वर्षांत ही मते दीड लाखांवर जाण्यासाठी प्रयत्न करू. - परशुराम तावरे, भामुश्रीफांकडून पैशांचा वापरयापुढेही झुंडशाही विरुद्ध लढा देत राहू. मुश्रीफ यांनी या निवडणुकीत प्रचंड पैशांचा आणि अनागोंदीचा केलेला वापर, याचा विचार करता त्यांचा हा नैतिक पराभव आहे.- संजय घाटगे, शिवसेना उमेदवार जप