शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

कागल, मुरगूड, पन्हाळा पालिकेचा गौरव

By admin | Updated: September 1, 2016 00:39 IST

नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, जनता या सर्वांच्या एकजुटीने सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज ‘कागल’चे नाव देशात ‘टॉप’वर आले आहे.

कागल : कागल हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ २००९ मध्येच झाला. नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, जनता या सर्वांच्या एकजुटीने सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज ‘कागल’चे नाव देशात ‘टॉप’वर आले आहे.२००९-१० पर्यंत आज जेथे साबिया अपार्टमेंट, गोसावी वसाहत, दुधगंगा नदी परिसर, यशवंत किल्ला परिसर, गणेशनगर, बेघर वसाहत, मडीगेट येथे उघड्यावर शौचास बसत. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने गुडमॉर्निंग पथक नेमून यास प्रतिबंध केले. हे पथक पोलिसांद्वारे थेट कारवाई करीत न्यायालयात हजर करू लागले. आजही हे पथक पहाटे पाहणी करते. मे २०१६ मध्ये नगरविकासच्या बैठकीत शहर १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा दावा सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे मुख्याधिकारी प्रभाकर पत्की यांनी सादर केला. त्यानंतर पुणे आयुक्त, नगरविकास मंत्रालय आणि केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने पाठविलेली पथके आणि शॉर्ट फिल्मसाठी आलेले पथक यातून ‘कागल’चे नाव हागणदारीमुक्त शहर म्हणून घेतले. मुरगूडला मिळणार पाच कोटीमुरगूड : केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबलेल्या हागणदारीमुक्त शहर योजनेत मुरगूड नगरपालिका पूर्ण तयारीनिशी उतरली होती. तालुका, जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर अशा चारवेळा शहराची विशेष पथकाकडून पाहणी झाली होती. या चारही वेळा अपवाद वगळता शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाल्याचा अहवाल या पथकाकडून मिळाला होता. विभागीय व राज्य पातळीवर समाधानकारक काम केल्याबाबत राज्य सरकारकडून पालिकेला एक कोटी रुपयांचे विशेष बक्षीस मिळाले होते. या शहराची विविध पातळीवर चारवेळा तपासणी करताना प्रत्येक वॉर्ड, गल्लीत जाऊन पहाटे व संध्याकाळीही पाहणी केली.या शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये बोलावून त्यांचा यथोचित गौरव केला जाणार आहे. विरोधी गटाच्या सदस्यांनीही सहकार्य केले असून, सत्ताधारी सर्व नगरसेवक, अधिकारी व कमर्चारी या सर्वांमुळेच हा बहुमान मिळाला असल्याचे प्रवीणसिंह पाटील यानी सांगितले. केंद्रीय समितीलासुद्धा पूर्ण तयारीनिशी सामोरे जाणार असून, देशात अव्वल राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या अभियानासाठी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे, उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी , शिवाजी इंदलकर, परेश चौगुले, वसुधा कुंभार, माया चौगले, गौराबाई सोनुले, फुलाबाई कांबळे, रेखा सावर्डेकर, मुख्याधिकारी बी. एस. जगताप, प्रभाकर पत्की, प्रकाश पोतदार, रमेश पाटील, अनिल गंदमवाड, दिलीप कांबळे, शशिकांत मोहिते, अमर कांबळे, बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.मुरगुडात कर्मचाऱ्यांंनाबक्षीस देण्याचा ठरावमुरगूड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर योजनेसाठी अहोरात्र झटलेल्या आरोग्य विभाग व संबंधित कर्मचाऱ्यांना मुरगूड नगरपालिकेकडून विशेष बक्षीस देण्याचा ठराव बुधवारी सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. नगरपालिकेचा अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नम्रता भांदिगरे होत्या. माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांंना भरीव बक्षीस देण्याचा ठराव मांडला.४शहरात उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे : ०९ होती.४त्या जागा नगरपालिकेने विविध कामांसाठी उपयोगात आणल्या.४२०१३-१४ मध्ये ९६५ वैयक्तिक शौचालये उभारली. त्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे ९३ लाख रुपयांचे अनुदान दिले.४२०१५-१६ मध्ये २७१ लोकांना वैयक्तिक शौचालयासाठी प्रत्येकी १२ हजारप्रमाणे ३२ लाख ५० हजार रुपये दिले आहेत.४उघड्यावर शौचास बसणाऱ्या ११९ जणांवर गुडमॉर्निंग पथकाने न्यायालयात हजर केले, तर समज देऊन २२९ जणांना सोडले.४शहरात १८ ठिकाणी मिळून २२४ सिटर सार्वजनिक शौचालये.४२० सिटर ०२ फिरती शौचालये, ०२ मैला उपसा टॅँकर. ४६५ कंत्राटी आणि २० कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेची साफसफाईची कामे करीत ही मोहीमही राबविली.४उघड्यावर शौचास बसू नये यासाठी लोकांचे विविध माध्यमांद्वारे प्रबोधन.