शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कागल-भुदरगड अंतर कमी होणार

By admin | Updated: December 17, 2015 01:20 IST

वाघापूर पूल वाहतुकीसाठी सज्ज : प्रवाशांना होणार फायदा; भुदरगडमधील ५0 गावे मुरगूडशी जोडणार

अनिल पाटील-- मुरगूड -कागल व भुदरगड या दोन तालुक्यांना जोडणारा मुरगूड-वाघापूर दरम्यान वेदगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्णत्वास गेल्याने वाहतुकीस तो सज्ज झाला आहे. काही दिवसांतच वाहतुकीसाठी तो खुला केला जाईल. यामुळे भुदरगड तालुक्यातील ५0 गावे मुरगूड शहरांशी जोडली जाणार असल्याने प्रवाशांना या पुलाचा फायदा होणार आहे. या पुलामुळे नदीतून, नावेतून होणाऱ्या धोकादायक वाहतुकीला पूर्णविराम मिळणार आहे.भुदरगड तालुक्यातील वाघापूर, कुर, व्हनगुती या गावांसह अन्य गावांतील लोकांना मुरगूडला यायचे असल्यास मुधाळतिट्टामार्गे फिरून यावे लागत होते. पर्यायाने हे लोक मुरगूडला पर्याय गारगोटीचा वापर करत होते. मुरगूडचा आठवडी बाजार प्रसिद्ध असल्याने वाघापूर पट्ट्यामध्ये भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना होणारी अडचण तसेच वाघापूर येथील प्रसिद्ध मंदिर जोतिर्लिंगाची यात्रा व उपस्थित भाविकांची कुचंबणा लक्षात घेऊन हा पूल व्हावा यासाठी तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक व तत्कालिन आमदार के. पी. पाटील यांनी प्रयत्न करून पुलाबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला.या पुलासाठी शासनाने साडेसात कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी प्रत्यक्ष पूल बांधण्यासाठी मुरगूड व वाघापूर गावापर्यंतचे रस्ते करणे यासाठी निधीचा वापर करण्यात आला. अत्यंत युद्धपातळीवर आकर्षक अशा पुलाचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. दोन्ही बाजूला रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. या रस्त्यामध्ये वाघापूर व मुरगूडमधील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मध्यंतरी या पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी धाव घेऊन आंदोलन करून बांधकाम बंद पाडले होते. त्यानंतर पाटबंधारे व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनीशेतकऱ्यांबरोबर चर्चा करुन सर्व बाधीत शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन दिले. रस्त्याचे काम यामुळे खोळंबले होते. पण पुन्हा वेगाने ते सुरु झाले आहे.पुलाच्या उभारणीपूर्वी वाघापूर, कुर, व्हनगुत्ती या गावांतून मुरगूडला शाळेसाठी येणाऱ्या मुलांना व अन्य प्रवाशांना वाहतुकीसाठी जि. प. मार्फत नाव देण्यात आली होती.वेदगंगेतून या नावेतून मुले धोकादायक प्रवास करीत होते. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.त्यानंतर भुदरगड व कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधी या पुलासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना भाग पाडले. शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केल्यामुळे चर्चेत राहिलेला हा पूल आता पूर्णत्वास गेला आहे. पुलावरुन वाहतूक सुरूवाघापूर मुरगूड पुलाच्या रस्त्याचे काम सुरु आहे. पण पुलाजवळ जोड रस्ता काढल्याने पुलावरुन सायकल, मोटारसायकल, छोट्या गाड्या जात आहेत. त्यामुळे गारगोटीकडे जाणाऱ्या लोकांना या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येतो.मुदाळतिट्टावरुन मुरगूडला अंदाजे १0 कि. मी. फेरा मारुन येण्याऐवजी या पुलाचा वापर करणे सोईचे होईल. यामुळे आदमापूर येथील बाळूमामा मंदिराजवळ होणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी होईल.