शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कदमवाडी शोकाकुल

By admin | Updated: January 4, 2015 01:21 IST

अंजना नामदेव कांबळे यांचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर : कुलदैवत पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविक अंजना नामदेव कांबळे यांचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच कोल्हापुरातील कपूर वसाहत (कदमवाडी) येथे शोककळा पसरली. अंजना कांबळे यांच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांना दोन मुलगे रमेश व राजू आहेत. त्यांच्यासोबत त्या कपूर वसाहतीमध्ये दहा बाय पंधराच्या छोट्याशा घरामध्ये राहत होत्या. दोन्ही मुले पेंटिंगचा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. जानेवारी महिन्यामध्ये पालीच्या खंडोबाच्या यात्रेस वसाहतीमधील सुमारे ५० ते ६० महिला व पुरुष दरवर्षी जात असतात. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविक पालीला गेले आहेत. आज, शनिवारी सकाळीच अंजना कांबळे शेजारील महिलांसोबत पालीला गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल कपूर वसाहतीमध्ये आले. पोलीस पाहून येथील लोक बिथरले. पोलिसांनी अंजना कांबळे यांच्या घराची विचारपूस केली व ते थेट त्यांच्या घरी पोहोचले. घरामध्ये रमेश, त्यांचा भाऊ राजू व बायका-मुले होती. घरातील वातावरण खेळीमेळीत होते. पोलिसांनी त्यांना पालीच्या यात्रेत हत्तीच्या हल्ल्यामध्ये तुमच्या आईचा मृत्यू झाल्याचे सांगताच घरामध्ये या दोघा मुलांसह बायका-मुलांनी टाहो फोटला. आक्रोश ऐकून वसाहतीमधील इतर लोकांनी कांबळे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मुले व नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पालीकडे रवाना झाले. येतो म्हणून गेल्या पण... अंजना कांबळे गेली दहा वर्षे पालीच्या यात्रेला जातात. सकाळी चहा घेऊन घरातील दोन्ही मुलांचा, सुना व नातवंडांचा निरोप घेऊन त्या बाहेर पडल्या. गल्लीतील इतर महिलांना त्या हसत-खेळत ‘येतो’ म्हणून गेल्या होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच वसाहतीमधील महिला त्यांची आठवण काढून आक्रोश करीत होत्या. हे दृश्य पाहून संपूर्ण वसाहतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती.