शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Jyotiba Chaitra Yatra 2018  डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी, यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:27 IST

दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा आज शनिवारी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंनी डोंगराचा परिसर फुलला आहे.

ठळक मुद्दे डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी, यंत्रणा सज्जमहाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील लाखो भाविक

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा शनिवारी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंनी डोंगराचा परिसर फुलला आहे.जोतिबा देवस्थानची चैत्र यात्रा ही वर्षातली सर्वात मोठी यात्रा असते. यात्रेसाठी सात ते आठ लाख भाविक उपस्थित असतात. यात्रेनिमित्त शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होईल. साडे बारा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सासनकाठ्यांचे पूजन त्यानंतर मिरवणूक होईल.

सायंकाळी साडे पाच वाजता श्रीं ची पालखी यमाई मंदिराकडे जाण्यास निघेल. सायंकाळी सात ते आठ या वेळेत पालखी यमाई मंदिरात थांबून त्यानंतर पून्हा मंदिराकडे निघेल. रात्री दहा वाजता श्रींची आरती, धुपारती होून देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले राहील.यात्रेनिमित्त कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर आगार आणि पंचगंगा नदी घाट येथून जादा एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. पंचगंगा नदी घाटावर भाविकांसाठी निवारा शेड तसेच स्नानासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.

याठिकाणाहून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे डोंगराच्या दिशेने रवाना होत आहेत. पंचगंगा नदी घाटावर अन्नछत्राचा लाभ आणि काही वेळ विश्रांती घेवून हे भाविक पुढच्या प्रवासाला निघत आहेत.दुसरीकडे जोतिबा डोंगरावर सासनकाठ्या घेवून आलेल्या भाविकांनी अलोट गर्दी होत आहे. गायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी नाष्टा, चहा आणि अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. तर डोंगरावर आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे अन्नछत्र सुरू झाले आहे. याचे उदघाटन कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले.

भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मंदिर परिसरात २८ सीसीटीव्ही कॅमेरे,२ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर तसेच देवस्थानच्यावतीने १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.  परिसरातील भाविकांना देवाचे दर्शन व्हावे यासाठी चार स्क्रीनची सोय करण्यात आली आहे तसेच २५ वॉकीटॉकी असणार आहेत. यात्रेदरम्यान कोठेही अुनचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने सुमारे दीड हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सोयभाविकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी एक कोटी लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शिवाय १४५ शौचालय, वीजपुरवठा खंडित झाला तर ४ फिरते जनरेटर,४२ केव्ही जनरेटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिरात पुरेशी फॅन व्यवस्था, दर्शन मंडपात स्मोक एक्स्ट्राक्टर बसविण्यात आले आहे.

केएमटीची विशेष बससेवाजोतिबा यात्रेसाठी केएमटीच्यावतीने ४० बसेसची सोय करण्यात आली आहे. दानेवाडी फाटा ते श्री जोतिबा व गिरोली फाटा ते यमाई मंदिर अशी विशेष बससेवा राहील. दुचाकी व चारचाकी वाहन घेवून येणाऱ्या भाविक नागरिकांसाठी पार्कींग ठिकाणापासून श्री जोतिबापर्यंत परिवहन उपक्रमामार्फत सकाळी सहा वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत ही सेवा मोफत देण्यात येणार आहे.

या दिवशी परिवहन उपक्रमाच्या नियमित वाहतूक संचलनात सर्व मार्गावरील फ्रिक्वेन्सीत बदल होणार असल्याने दैनंदिन वाहतूक करणाऱ्या केएमटी प्रवाश्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूर