शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बसमालकांच्या घरी जाऊन स्कूल बसची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 04:44 IST

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. तपासणीसाठी वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट

कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. तपासणीसाठी वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची पुनर्तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी ३१ मे अखेर प्रादेशिक परिवहनकडून करून घेणे स्कूल बसमालकांना बंधनकारक केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ७५० स्कूल बसेसच्या मालकांपैकी २०० बसेस मालकांनी ही पुनर्तपासणी अद्यापही केलेली नाही. तपासणी न केलेल्या या बसमालकांना प्रादेशिक परिवहनने नोटीसही बजावली आहे. तरीही अनेकांनी तिला प्रतिसाद दिलेला नाही.याच पार्श्वभूमीवर, अधिकाºयांच्या बैठकीत त्या बसमालकांच्या घरी थेट जाऊन त्यांच्या बसेसची तपासणी करण्याचे आदेश प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी दिले.दोषी आढळणाºया अशा वाहनांवर कठोर कारवाईही हे कार्यालय करणार आहे. या बसेसमध्ये स्पीड गव्हर्नर, अग्निशमन यंत्र, आसनक्षमता, प्रशिक्षित चालक, पुरुष व महिला सहायक आहेत की नाहीत. सुरक्षेचे उपाय, काचांची स्थिती, टायर, आदींचीही तपासणी केली जाणार आहे. थेट बसेस मालकांच्या घरोघरी जाऊन केली जाणार आहे.