शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
2
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
3
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
4
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
5
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
6
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
7
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
8
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
9
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
10
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
11
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
12
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
13
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
14
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
15
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
16
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
17
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
18
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
19
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
20
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

ज्वारीच्या दरात दोन रुपयांची घसरण

By admin | Updated: January 5, 2015 00:43 IST

मेथीची मोठी आवक : सांगोल्याच्या ‘तैवान’ वाणाच्या पपईची ग्राहकांना भुरळ

कोल्हापूर : विविध आजारांवर गुणकारी असणाऱ्या पपईची आवक वाढली आहे. सांगोला येथील ‘तैवान’ वाणाच्या चवीला गोड असणाऱ्या पपईने ग्राहकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. कडधान्य मार्केट स्थिर असले तरी ज्वारीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर आवाक्यात असले तरी मेथीने बाजार अक्षरश: फुलून गेला आहे. मराठवाड्यात अवकाळी पाऊस चांगला झाल्याने ज्वारीचे पिके जोमात आहे. त्याचा थेट परिणाम ज्वारी मार्केटवर झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ‘नंबर वन’ ज्वारीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची घसरण झाली आहे. जिरेच्या दरात किलोमागे चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. मध्यंतरी एकदमच कडाडलेला शाबूदाणा आता थोडा आवाक्यात आला आहे. तेलावर ५ टक्के कर आकारल्याने सरकी तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली होती, ती कायम आहे. साखरेच्या दराने गेले महिनाभर आपली जागा सोडलेली नाही. हरभरा डाळ, तूरडाळ, मुगडाळीचे दर तुलनात्मक स्थिर आहेत. खोबऱ्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. स्थानिकच्या भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने भाजी मार्केट स्थिर दिसत आहे. गवार वगळता सर्वच भाज्यांचे दर तुलनेने स्थिर आहेत. घाऊक बाजारात गवारचे दरात किलोमागे वीस रुपयांची वाढ झाली आहे. गाजर, हरभरा पेंडी व कांदा पातची आवक वाढली असून, त्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. कोल्हापूर बाजार समितीत रोज मेथीची ५० हजार पेंडीची आवक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दहा रुपयाला तीन पेंड्या विकाव्या लागत आहेत.थंडी व ढगाळ वातावरणामुळे फळ मार्केटमध्ये कमालीची शांतता दिसत आहे. फळांचा उठाव होत नसल्याने दर स्थिर आहेत. सफरचंद, संत्री, अननस, बोरे, स्ट्रॉबेरीची आवक चांगली आहे. सांगोला, पंढरपूरमधून पपईची आवक सुरू आहे. पिवळी धमक पपई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून २० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत पपईचे दर आहेत. (प्रतिनिधी)जिरे ४० रुपयांनी महागलेजिरेच्या दरात किलोमागे चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. मध्यंतरी एकदमच कडाडलेला शाबूदाणा आता थोडा आवाक्यात आला आहे. तेलावर ५ टक्के कर आकारल्याने सरकी तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली होती, ती कायम आहे. गूळ तेजीतसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात थोडी वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी दरात शंभर रुपयांची वाढ झाली असून, प्रतिक्विंटल ३३०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. कांदा-बटाटा स्थिर!बाजार समितीत रोज ५८७४ पोती कांद्याची आवक होते. कांद्याचे दर सरासरी १३ रुपये, तर बटाट्याचे दर १८ रुपयांवर स्थिर आहे. सांगोला व पंढरपूर येथून ‘तैवान’ व ‘सिडलेस’ असे दोनप्रकारच्या पपईची आवक सुरू आहे. ही पपई गोड व आरोग्यास चांगली असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. - एस. के. बागवान, फळ विक्रेते