शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

एकमेकांची जिरवताना दोघांचीही जिरली : आवाडे-आवळे मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 01:01 IST

हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा ...

ठळक मुद्देप्रकाश आवाडे यांची कबुली ; राजू आवळे यांना आमदार करणार

हातकणंगले : काँग्रेसमध्ये एकमेकांची जिरवायच्या नादात दोघांचीही चांगलीच जिरली, अशी कबुली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शनिवारी चोकाक (ता. हातकणंगले) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली. त्यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचा मुलगा राजूबाबा आवळे याला हातकणंगले मतदारसंघातून आमदार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. या मेळाव्यात ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी एकमेकांना आलिंगन दिले व यापुढे मतभेद गाडून एकत्रित वाटचाल करण्याचे जाहीर केले. मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट करून या मनोमिलनाला पाठबळ दिले.प्रकाश आवाडे यांनी आपल्या भाषणाचीच सुरुवात राजूबाबा हा उद्याचा आमदार असल्याचे सांगून केली. ते म्हणाले, ‘आवाडे व आवळे गट आता एकदिलाने एकत्र आला आहे, ही तात्पुरती मलमपट्टी नाही. काँग्रेस दुरुस्त व्हायची असेल तर अगोदर नेत्यांतील भांडणे मिटली पाहिजेत, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धरला होता. त्यानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी पुढाकार घेऊन त्याची सुरुवात केली. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीच्या शेजारील हॉल बांधकामाच्या कार्यक्रमात त्यांनी हा विचार बोलून दाखविला व त्यानुसार आम्ही एकसंधपणे पुढे जायचे ठरविले. कोल्हापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे; त्यामुळे एकेकाळी एकट्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघांत काँग्रेसचे आमदार होते; परंतु त्यानंतर आम्ही मंडळीच एकमेकांची जिरवायच्या नादाला लागलो व त्यात आमचीच जिरली. त्यासाठी विरोधकांची गरजच उरली नाही; परंतु आता हे आम्हांला उमगले आहे. लोकांचाही रेटा आहे.’आवाडे म्हणाले, ‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूत होते; कारण नुसता एक खडा पाण्यात टाकल्यावर जसे वलय उमटते,तसेच या तिन्ही मतदारसंघांचे राजकारण आहे. पूर्वीच्या इचलकरंजी मतदारसंघातील १३ गावांनी उचलून घेतले तर राजूबाबांची गाडी विधानसभेला जाण्यात अडचण नाही. राजूबाबा असेल किंवा गणपतराव पाटील; हे काय आमच्यासाठी वेगळे नाहीत.’आवाडे व आवळे यांची गळाभेट ही काँग्रेसची मोठी उपलब्धी असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही जो उमेदवार सुचवाल तोच आमचा उमेदवार असेल, असे चव्हाण यांनी सांगितले.जयवंतराव आवळे म्हणाले, ‘काँग्रेसवर मनापासून प्रेम करणारा हा मतदारसंघ आहे; परंतु दुहीमुळे आमचा पराभव झाला. मी व आवाडे गेल्या पंधरा वर्षांत कधीही एका व्यासपीठावर आलो नव्हतो; परंतु आज आवाडे-आवळे एकत्र आले आहेत. जे झालं ते गंगेला मिळालं. आता यापुढे हातात हात घालून पुढे जाऊ या.’हातकणंगले लोकसभाही घ्याआमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३१) कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला.हातकणंगलेची जागा तर गेल्या निवडणुकीत आम्हीच लढवली आहे. त्यामुळे मित्रपक्षांसोबत आघाडी झाली तर हा प्रश्नयेणार नाही; परंतु ती नाही झाली तर हा मतदारसंघही काँग्रेसला मिळावा, अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली.शिरोलीतून सुरुवात ही नांदीकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात शिरोलीत झालेल्या जंगी स्वागताने झाली, याचा वेगळाच आनंद असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद निवडणुकीत मला जे जमले नाही ते आता यशस्वी झाले.फेव्हीक्विक एकजूटआवाडे व आवळे यांची एकजूट ही चिकटपट्टीची नाही, तर ती फे व्हीक्विकसारखी मजबूत असल्याने आता तुटणार नाही, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगताच हशा पिकला.सहा आमदारकोल्हापुरात सध्या काँग्रेसचा एकही आमदार नाही; परंतु नेत्यांनी मतभेद गाडून टाकले तर दहापैकी किमान सहा आमदार काँग्रेसचे होण्यात अडचण नसल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच आवाडे-आवळे एकाच व्यासपीठावर‘आवाडे-आवळे गट एकत्र आले तर इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले या तिन्ही मतदारसंघांत काँग्रेस मजबूततुम्ही जो उमेदवार सुचवालतोच आमचा उमेदवार असेल,अशी अशोक चव्हाण यांचीग्वाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण