शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्‍त भागात मदत पोहचविण्यास प्राधान्य हवे : अनिता नेवसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 16:02 IST

महापुराने ओढवलेल्‍या संकटाचा सामना करण्यासाठी  जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. दुर्गम खेडी, वाड्या-वस्‍त्‍या या ठिकाणी खरी मदतीची गरज आहे. त्‍याठिकाणी त्‍वरित मदत पोहचविण्यासाठी प्राधान्य  हवे, असे  मत कौटुंबिक न्‍यायालयाच्या न्यायाधीश डॉ.अनिता नेवसे यांनी व्‍यक्‍त केले. ​​​​​​​

ठळक मुद्देपूरग्रस्‍त भागात मदत पोहचविण्यास प्राधान्य हवे : डॉ. अनिता नेवसेकौटुंबिक न्‍यायालय बार असोशिएशनतर्फे पूरग्रस्‍त आश्रमशाळेला मदत

कोल्हापूर :  महापुराने ओढवलेल्‍या संकटाचा सामना करण्यासाठी  जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. दुर्गम खेडी, वाड्या-वस्‍त्‍या या ठिकाणी खरी मदतीची गरज आहे. त्‍याठिकाणी त्‍वरित मदत पोहचविण्यासाठी प्राधान्य  हवे, असे  मत कौटुंबिक न्‍यायालयाच्या न्यायाधीश डॉ.अनिता नेवसे यांनी व्‍यक्‍त केले.आश्रमशाळा पळसंबे (ता.गगनबावडा) येथे कौटुंबिक न्‍यायालय बार असोशिएशन व कौटुंबिक  न्यायालय  यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने पूरग्रस्‍त शाळेला एक हात मदतीचा या कार्यक्रमप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कौटुंबिक न्‍यायालय बार असोशिएशनचे अध्‍यक्ष वकील किरण खटावकर होते.      महापुराच्‍या संकटाला खंबीरपणे तोंड देतानाच सामाजिक बांधीलकीची जाणीवही ठेवली पाहिजे, असे सांगून आश्रम शाळेतील मुले व कर्मचारी वृंद यांना स्‍वच्‍छतेचे महत्‍त्‍व, आरोग्‍याची काळजी व गुणवत्‍ता  वाढीसाठी न्‍या.डॉ. नेवसे यांनी मार्गदर्शन केले.दुर्गम भागातील अडी-अडचणी जाणून घेऊन त्‍या सोडविणे आमचे कर्तव्‍य आहे. शिक्षण हा विकासाचा पाया असून शाळेच्‍या सर्वांगीण विकासास सदैव प्रयत्‍नशील राहू असे आश्वासन बार असोशिएशनचे अध्‍यक्ष खटावकर यांनी दिले.महापुराने झालेल्‍या नुकसानीत विद्यार्थी वर्गाकडे कुणाचेही लक्ष नसल्‍याने विद्यार्थ्‍यांच्‍या  शैक्षणिक साहित्‍याची जी हानी झाली आहे ती भरून काढण्यासाठी शाळेला मदत करण्‍याचे ठरविले असल्‍याचे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्‍याचे कार्यकारी संचालक जयदिप पाटील यांनी सांगितले. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्‍यक्ष वकील संजयकुमार गायकवाड, सचिव वकील उमर मुजावर, उदय पडवळ, पत्रकार पंडित सावंत यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.पळसंबे आश्रमशाळेस चादर, गाद्या, उशा असे साहित्य  माध्‍यमातून देवून खाऊ वाटप केले. कार्यक्रमास शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष भागोजी कोळेकर व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांचे स्‍वागत व आभार शिक्षक उगलमुगले यांनी केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरCourtन्यायालय