शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत : नलवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:44 IST

न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देन्यायाधीश कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत : टी.व्ही. नलवडेअ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅकॅडमीच्यावतीने कोल्हापूरात वकील प्रशिक्षण शिबीर

कोल्हापूर : न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले. अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅकॅडमीच्यावतीने वकिलांसाठी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकील प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी होत्या.यावेळी नलवडे यांनी न्यायालयाला घटनेचे कलम २२६ प्रमाणे प्राप्त असलेले अधिकार आणि त्यांचे महत्व तसेच लवाद शासकीय विभाग, पोलिस यंत्रणा व सरकार यांच्याविरोधात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.

गोवा सरकारचे अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. देवीदास पांगम, वृषाली जोशी  यांनी उच्च न्यायालयात वकील करतानाचे आपले अनुभवही यावेळी कथन केले. अ‍ॅडव्होेकेटस् अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. सिध्दार्थ पाटकर यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. संतोष शहा यांनी मनोगत व्यक्त केले तर अ‍ॅड. अमीर शेख यांनी आभार मानले.या शिबीरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अ‍ॅड. अनिल साखरे, सिनिअर कौन्सिलर अ‍ॅड. अशोक मुंडरगी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. अभय नेवगी, अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र, गोवाचे सदस्य अ‍ॅड. पारिजात पांडे, अ‍ॅड. संग्राम देसाई ,कोल्हापूरचे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल, सिंधुदुर्गचे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संदेश तायशेटे यांच्यासह वकील आणि कायद्याचे अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.कोल्हापूर येथे शनिवारी आयोजित उच्च न्यायालयातील वकीलबाबतच्या मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन न्यायाधीश अ‍ॅड. टी.व्ही. नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून न्यायाधीश वृषाली जोशी, अ‍ॅड. देवीदास पांगम, अ‍ॅड. सिध्दार्थ लाटकर, अ‍ॅड. संतोष शहा, अ‍ॅड. अनिल साखरे, अ‍ॅड. अशोक मुंडरगी, अ‍ॅड. अभय नेवगी, अ‍ॅड. युवराज नरवणकर उपस्थित होते.

टॅग्स :advocateवकिलkolhapurकोल्हापूर