शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा मंदिरात मानाची सासनकाठी दाखल

By admin | Updated: March 22, 2015 01:12 IST

उंट, घोडे, सवाद्य मिरवणुकीने मानाच्या सासनकाठीचे स्वागत

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर गुढीपाडवा मोठ्या धार्मिक उत्साहात साजरा झाला. जोतिबा मंदिरात गुढी पूजन, नवीन वर्षाचे पंचांग वाचन, गूळ-कडूलिंब वाटपाचा कार्यक्रम झाला. हिम्मत बहाद्दूर चव्हाणांची सासनकाठी जोतिबा मंदिरात दाखल झाली. दख्खनचा राजा श्री जोतिबाची चैत्र यात्रा ३ एप्रिलला होणार आहे. यानिमित्त शनिवारपासूनच श्री जोतिबा मंदिरात मानाच्या सासनकाठ्या येण्यास प्रारंभ झाला आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मत बहाद्दूर चव्हाण यांची जोतिबा मंदिरात प्रथम सासनकाठी दाखल होते. शनिवारी सकाळी ११ वाजता उंट, घोडे, सवाद्य मिरवणुकीने या मानाच्या सासनकाठीचे स्वागत झाले. मंदिर प्रदक्षिणा काढून सदरेसमोर ही मानाची सासनकाठी उभी करण्यात आली. या सासनकाठीसमवेत रणजितसिंह चव्हाण, संग्रामसिंह चव्हाण, रणवीरसिंह चव्हाण, महेंद्रसिंह चव्हाण, सुजय परदेशी उपस्थित होते. दुपारी १२ वाजता नवीन वर्षाचे पंचांग वाचन ग्रामोपाध्ये केरबा उपाध्ये यांनी केले. यावेळी ‘श्रीं’चे पुजारी, देवसेवक, गावकर, देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सिंधीया ट्रस्टचे प्रभारी आर. टी. कदम, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, पं. स. पन्हाळाचे माजी सभापती विष्णुपंत दादर्णे, समस्त उपाध्ये, ग्रामस्थ, पुजारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गूळ व कडूलिंबाचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)