शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची मोठया धार्मिक उत्साहात सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:33 IST

चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची शुक्रवारी मोठया धार्मिक उत्साहात सांगता झाली. गुरुवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार सकाळी ६.३० वाजता धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली.

ठळक मुद्देजोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रामोठया धार्मिक उत्साहात सांगता

जोतिबा : चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची शुक्रवारी मोठया धार्मिक उत्साहात सांगता झाली. गुरुवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार सकाळी ६.३० वाजता धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली.जोतिबा डोंगराची दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा. श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला. त्यासमयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला, तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दूर्वा, बेल वाहून पूजा केली. तेव्हापासून आजतागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दूर्वा, बेल, फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते.लिंबूमुळे देवीच्या अंगाचा दाह ज्याप्रमाणे शांत केला, तसा भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेत भक्ताना लिंबूयुक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असतात. ह्या वैशिष्टयपूर्ण यात्रेला भक्तांनी जोतिबा डोंगरावर गर्दी केली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले होते. भाविकांनी षष्ठीचा उपवास केला, तसेच चोपडाई देवीला पोषाख अर्पण केला.मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड , सांगली, कोल्हापूरातुन रात्रभर भाविक जोतिबा डोंगरावर येत होते. पोलिस बंदोबस्त मोठया प्रमाणात ठेवण्यात आला होता. दर्शन रांगेसाठी शेड उभा करण्यात आले आहे.

डोंगर घाटमार्गातून एकेरी वहातुक व्यवस्था करण्यात आली होती, तसेच राज्य परिवहन महामंडळामार्फत जादा एसटीची सोयही करण्यात आली होती. रात्रभर मंदिरात सुरू असणारी धुपारती पालखी आज सकाळी ६.३० वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली.

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर