शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत..

By admin | Updated: May 18, 2015 01:19 IST

शिवकुमार यांची व्यथा : ‘जेमिनी सर्कस’मध्ये ९१ व्या वर्षी करत आहेत विदूषकाचे काम

सचिन भोसले / कोल्हापूर मेरा नाम जोकर, एक होता विदूषक अशा चित्रपटांतून त्याची दु:खं मांडली गेली; पण ‘हसविणारा तो’ एवढीच त्याची प्रतिमा लोकांच्या लक्षात राहिली. त्यामागील त्याची जळजळ मात्र कुणीच ध्यानात घेतली नाही... अशीच कहाणी आहे ‘जेमिनी सर्कस’मधील शिवकुमार भैया रामानंद या ९१ वर्षीय विदूषकाची. चित्रविचित्र पेहराव, रंगविलेला चेहरा आणि विचित्र, विनोदी हावभाव करणारा विदूषक सर्कसच्या रिंगणात आला की, पोट धरून हसावंच लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही चेष्टा करावी, अशी विदूषकाची प्रतिमा असते. सध्या ‘जेमिनी सर्कस’मध्ये ९१ वर्षीय शिवकुमार भैया रामानंद यांची स्थिती तर ‘मेरा नाम जोकर’मधील विदूषकासारखी झाली आहे. त्यांच्यामागे कुटुंबातील कोणीच नसल्याने जेमिनी सर्कस हेच त्यांचे घर झाले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी ते ‘जेमिनी’मध्ये दाखल झाले. प्रथम मिळेल ते आणि मालक सांगतील ते काम शिवकुमार करीत होते. यामध्ये दोर बांधणे, साहित्य उचलणे, गेटवर वॉचमन, मजूर अशी पडेल त्या कामांचा समावेश होता. ही कामे वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी केली. आता मात्र शरीर साथ देत नसल्याने त्यांना काम जमेनासे झाले आहे. ‘जेमिनी’च्या मालकांनी ते जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना जमेल ते काम द्या आणि आपल्याच सर्कसचा एक भाग आहेत म्हणून सांभाळा, असे व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यामुळे पहिली पन्नास वर्षे मजूर म्हणून काम करणारे शिवकुमार आता गेल्या दहा वर्षांपासून विदूषक म्हणून काम करीत आहेत. शिवकुमार आपल्या कामाबद्दल सांगताना म्हणाले, उत्तर प्रदेशातील बस्ती या गावात राहणारा मी. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने वयाच्या तेराव्या वर्षी मी घर सोडले. मिळेल ते काम केले. वयाच्या तिसाव्या वर्षी आमच्या शेजारील गावात ‘जेमिनी सर्कस’ आलेली. तेथे काम मिळते का म्हणून पाहण्यास गेलो. मला मजुराची नोकरी मिळाली व तब्बल साठ वर्षे जेमिनीशी एकनिष्ठ राहिलो आहे. गेली साठ वर्षे काम केल्यानंतर माझ्यामागे कोणीच नसल्याने मालकांनी ‘तू जिवंत असेपर्यंत तुला ‘जेमिनी’तून काढून टाकत नाही. जमेल ते काम कर,’ असे सांगितल्याने मी सर्कशीच्या रिंगणात गेली दहा वर्षे विदूषकाचे काम करतो आहे. सध्या सर्कशीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिल्याने सर्कशीतील विदूषकांच्या हातांना काम नाही. केवळ तोंडाला रंग असेपर्यंतच आम्हा कलाकारांना किंमत असते. रंग उडून गेल्यानंतर समाजही आमच्याकडे पाठ फिरवितो, अशी खंत शिवकुमार यांनी व्यक्त केली.