शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
3
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
4
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
5
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
6
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
7
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
8
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
9
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
10
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
11
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
12
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
13
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
14
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
15
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
16
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
17
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
18
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
19
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
20
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 18:42 IST

CoronaVirus MpscExam Kolhapur- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विविध पदांसाठी महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी  (दि. ११) होणारी संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. चौथ्यांदा ही परीक्षा पुढे गेली आहे. कोल्हापूर केंद्रांवरून या परीक्षेसाठी १९,७७६ जणांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची नवी तारीख राज्य शासनाने लवकर जाहीर करावी, अशी मागणी कोल्हापूरमधील परीक्षार्थींनी केली आहे.

ठळक मुद्देनवीन तारीख लवकर जाहीर करण्याची परीक्षार्थींची मागणी

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विविध पदांसाठी महाराष्ट्र राज्यसेवा लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी  (दि. ११) होणारी संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. चौथ्यांदा ही परीक्षा पुढे गेली आहे. कोल्हापूर केंद्रांवरून या परीक्षेसाठी १९,७७६ जणांनी नोंदणी केली होती. या परीक्षेची नवी तारीख राज्य शासनाने लवकर जाहीर करावी, अशी मागणी कोल्हापूरमधील परीक्षार्थींनी केली आहे.पीएसआय, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालयीन सहाय्यक या पदांसाठी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिय गट ब संयुक्त पूर्व परीक्षा यापूर्वी तीनवेळा लांबणीवर पडली होती. रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत एमपीएससीने ही परीक्षा आयोजित केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ५८ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने आणि शनिवारी, रविवारी विकेंड लॉकडाऊन असल्याने शासनाने ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय शुक्रवारी दुपारी जाहीर केला. कोरोनाबाबतची परिस्थिती पाहून या परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.परीक्षार्थी काय म्हणतात?

दीड वर्षांपूर्वी या परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे परीक्षा झाली असती, तर बरे झाले असते. लॉकडाऊनमध्ये मेन्सचा अभ्यास केला असता. या परीक्षेची नवी तारीख लवकर जाहीर करावी.-शीतल पवार, नांगनूर.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने परीक्षा पुढे ढकलली हे योग्य आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर केल्यास अभ्यासाचे नियोजन करता येईल.-शुभम पाटील, फुलेवाडी

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर