शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शासकीय नोकरीसाठी प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक हरपले, दिलीप गुळवणी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:26 IST

 कोल्हापूर येथील नोकरी आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक दिलीप नारायण गुळवणी (वय ६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने महाद्वार रोड येथील वांगी बोळातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कदमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देनोकरी, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक दिलीप गुळवणी यांचे निधनशासकीय नोकरीसाठी प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक हरपले

 कोल्हापूर : येथील नोकरी आणि स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक दिलीप नारायण गुळवणी (वय ६९) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने महाद्वार रोड येथील वांगी बोळातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कदमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दीपाली, मुलगा कृष्णकांत, मुलगी धनश्री, नातू असा परिवार आहे. शासकीय नोकरीसाठी प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक हरपले; चांगला माणूस निघून गेला, अशा प्रतिक्रिया गुळवणी यांच्या निधनानंतर व्यक्त झाल्या.गुळवणी यांनी सोमवारी (दि. ७) रात्री नऊपर्यंत स्टॅम्प लिहिण्याचे काम केले. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे उठले. काही वेळाने त्यांना अचानक थंडी वाजून आली. अस्वस्थ वाटू लागले. त्यातच हृदयविकाराच्या धक्क्याने सकाळी साडेसहा वाजता त्यांचे निधन झाले. गुळवणी काका या नावाने ते परिचित होते. त्यांचा स्वभाव बोलका होता. वांगी बोळ येथील राहत्या घरी ते स्टॅम्प विक्री करायचे.

सन १९८३ मध्ये त्यांनी नोकरी मार्गदर्शन केंद्राची सुरुवात केली. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच जेव्हा तरुणांना माहीत नव्हते, तेव्हा त्यांचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेची सर्व माहिती ते देत होते. अनेकदा पदरचे पैसे घालून त्यांनी अनेक मुलांचे परीक्षा शुल्क भरले.

मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयात जाऊन त्यांनी अर्ज जमा केले. त्यांच्या या मदतीमुळे कोल्हापूर आणि परिसरातील अनेकजण पीएसआय, तहसीलदार अशा विविध शासकीय पदांवर, बँक आणि एलआयसीमधील अधिकारी म्हणून नोकरीत लागले. मोबाईल, इंटरनेट नसलेल्या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा ते आधार होते.अनेकांची नोकरीची स्वप्ने सत्यात उतरविलीअंबाबाई मंदिर परिसरातील वांगी बोळामधील गुळवणी वाड्यातील छोट्या खोलीत दिलीप गुळवणी यांचे नोकरी मार्गदर्शन केंद्र होते. शासकीय, बँकिंग, एलआयसीतील भरतीच्या वर्तमानपत्रांतील जाहिरातींचे कात्रण ते या केंद्रातील दर्शनी भागातील फलकावर लावायचे.

या भरतीचे अर्ज भरून घेऊन ते पोस्टाने पाठविण्याचे कामही ते करायचे. या कामासाठी पाच ते दहा रुपये ते घ्यायचे. अनेकांची शासकीय, निमशासकीय, बँकिंग, आदी क्षेत्रांतील नोकरीची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी ते धडपडत राहिले. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांचे काम अविरतपणे सुरू होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर