शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

'जो पेन्शन पे बात करेगा वो देश पे राज करेगा', कोल्हापुरात भव्य रॅलीतून कर्मचाऱ्यांचा शासनाला इशारा 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 14, 2023 16:42 IST

संप काळात रोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कर्मचारी टाऊन हॉलमध्ये जमणार आहेत

कोल्हापूर : जो पेन्शन पे बात करेगा वो देशपे राज करेगा, एकच मिशन जुनी पेन्शन, पीएफआरडीए बिल रद्द करा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही... अशा घोषणा देत व भव्य रॅलीतून शासनाला इशारा देत आज, मंगळवारपासून जिल्ह्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी एल्गार पुकारला. शासनाला काय कारवाई करायची ती करू दे पण आता जुनी पेन्शन पदरात पाडून घेऊनच कामावर हजर होणार असा निर्धार करत जिल्ह्यातील ८० हजार कर्मचारी, शिक्षक संपात सहभागी झाले.सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करावी यासह आठ मागण्यांसाठी कर्मचारी व शिक्षकांनी मंगळवारपासून बेमुदत संपाचे अस्त्र उगारले. सकाळी साडे दहा वाजल्यापासून कर्मचारी व शिक्षक टाऊन हॉल बागेत जमत होते. येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, शासनाने आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करतो एवढे एक वाक्य म्हणावे आम्ही लगेच संप मागे घेतो. शासनाने केंद्राकडे पीएफआरडीए बिलातून महाराष्ट्राला वगळण्याची विनंती करावी.शैक्षणिक व्यासपीठचे एस. डी. लाड यांनी नवे शैक्षणिक धोरण रद्द करा व अशैक्षणिक कामे लावू नका अशी मागणी केली. शिक्षक परिषदेचे अध्यक्ष दादा लाड यांनी कारवाईची भीती बाळगू नका, संप यशस्वी करा असे आवाहन केले. यासह माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे भरत रसाळे, प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत, अतुल दिघे, दिलीप पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.दुपारी सव्वा बारा वाजता रॅलीला सुरुवात झाली. जुनी पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत आणि हातात फलक घेऊन कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले. यात पुरुषांबरोबरच महिलांची संख्याही प्रचंड होती. सर्वांनी डोक्यावर एकच मिशन जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घातल्या होत्या.

टाऊन हॉल, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी रोडमार्गे बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल चौक ते पुन्हा टाऊन हॉल येथे रॅलीचा समारोप झाला. संपा दरम्यान रोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कर्मचारी टाऊन हॉलमध्ये जमणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन