कोल्हापूर : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नाताळ (ख्रिसमस) या ख्रिस्ती बांधवांच्या मोठ्या सणाची लगबग शहरात सुरू झाली आहे. सणाकरिता लागणाऱ्या साहित्यानिशी बाजारपेठा सजल्या असून, शहरातील विविध चर्चही रोषणाईने झगमगली आहेत.
ख्रिसमसचा अर्थ क्राइस्ट्स मास प्रभू येशूचा जन्मदिन होय. हा सण शुक्रवारी (दि. २५) साजरा होत आहे. जरी हा सण ख्रिस्ती बांधवांचा असला तरी सर्वधर्मीय नागरीकही आपलाच सण म्हणून साजरा करतात. ख्रिसमसनिमित्त खास ख्रिसमस ट्री, सांताक्लाॅजचे कपडे, जिंगल बेल्स, बक्षिसांची पोटली, सांताचा बाहुला, दाढीसह मास्क, स्टार, झुरमुळ्या, मेरी ख्रिसमस बाहुली, सांताचे मुला, मुलींचे ड्रेस, येशूच्या जन्मदिनाचे कार्डशीट छायाचित्र व चिनी मातीच्या प्रतिकृती, विविध आकारातील मेणबत्त्या, अशा साहित्यांची दुकाने पापाची तिकटी पानलाईन, राजारामपुरी, आदी ठिकाणी सजली आहेत. अवघ्या तीन दिवसांवर सण आल्यामुळे शहरातील चर्चनाही रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हरेक प्रकारचे केक, डोनेट, पेस्ट्री, चीज, चाॅकलेट, आदींनी बेकऱ्याही सजल्या आहेत.
साहित्य असे,
ख्रिसमस ट्री - ५० ते २००० रु, सांताक्लॉज पुतळा - २० रुपये ते १० हजारांपर्यंत, डेकोरेशन टेडी - ८० ते ५५० रु., तारे - ४० ते ३५० रु., जिंगल बेल्स - १० ते ५५० रुपयांपर्यंत.
फोटो : २११२२०२०-कोल- ख्रिसमस०१,
आेळी : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या नाताळ सणाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीला वेग आला आहे. कोल्हापुरातील पापाची तिकटी येथील पानलाईन परिसरातील दुकानेही अशा साहित्यानिशी सज्ज आहेत.
फोटो : २११२२०२०-कोल- ख्रिसमस०२
आेळी : नाताळ सणाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीला वेग आला असून, साेमवारी पापाची तिकटी येथील दुकानामध्ये साहित्य खरेदीसाठी आलेली युवती.
(सर्व छाया : नसीर अत्तार)