शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी 'जद'चे महेश कोरी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 17:12 IST

gadhinglaj, munciplatly, elecation, kolhpaurnews गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे जनता दलाचे नगरसेवक महेश बसवराज कोरी यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या सावित्री पाटील यांचा त्यांनी तब्बल १० मतांनी पराभव केला.कोरींना १५ तर पाटील यांना केवळ ५ मते मिळाली.

ठळक मुद्देगडहिंग्लजची ऑनलाईन निवडणूककोरींना १५ तर विरोधी राष्ट्रवादीच्या सावित्री पाटील यांना केवळ ५ मते

गडहिंग्लज :गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे जनता दलाचे नगरसेवक महेश बसवराज कोरी यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीच्या सावित्री पाटील यांचा त्यांनी तब्बल १० मतांनी पराभव केला.कोरींना १५ तर पाटील यांना केवळ ५ मते मिळाली.मावळत्या उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे यांनी राजीनामा दिल्याने पालिकेच्या विशेष सभेत ही निवडणूक झाली.अध्यक्षस्थानीपीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रक्रियेव्दारे मतदान नोंदविण्यात आले.

प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार दिनेश पारगे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली. नरेंद्र भद्रापूर हे कोरी यांचे सूचक तर उदय पाटील हे अनुमोदक होत्या.शुभदा पाटील या पाटील यांच्या सूचक तर रेश्मा कांबळे या अनुमोदक होत्या. नूतन उपनगराध्यक्ष कोरी हे जनता दलाचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांचे जावई आहेत.त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवार उभा केल्यामुळे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी शहरात दुचाकीवरून विजयी मिरवणूक काढली. कुणाचे मत कुणाला.. ?'जद'च्या कोरी यांना नगराध्यक्षा प्रा. कोरी, नगरसेवक बसवराज खणगावे राजेश बोरगावे,उदय पाटील, नितीन देसाई,नरेंद्र भद्रापूर, शकुंतला हातरोटे, क्रांती शिवणे,सुनिता पाटील,वीणा कापसे,नाज खलिफा,शशीकला पाटील यांच्यासह भाजपाचे दीपक कुराडे व शिवसेनेच्या श्रद्धा शिंत्रे यांनीही मतदान केले. 'राष्ट्रवादी'च्या पाटील यांना हारूण सय्यद, शुभदा पाटील, रुपाली परीट, रेश्मा कांबळे यांनी मतदान केले.'गडहिंग्लज'मध्ये इतिहास घडला..!नूतन उपनगराध्यक्ष कोरी हे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांचे पती आहेत.गेल्या वर्षी वाढीव प्रभागातील निवडणुकीत ते विक्रमी मताधिक्यांनी निवडून आले आहेत.त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली.त्यामुळे गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्नी नगराध्यक्ष आणि पती उपनगराध्यक्ष असण्याचा बहुमान या दाम्पत्याला मिळाला. पहिल्यांदाच निवडणूक..!चार वर्षांत उपनगराध्यक्षपदासह विषय समिती सभापतीपदाच्या निवडीदेखील बिनविरोध पार पडल्या.यावेळी काहीतरी 'चमत्कार' घडेल या आशेने 'राष्ट्रवादी'ने निवडणूक लढवली.परंतु,त्यांच्या पदरी निराशाच आली. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर