शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

जयसिंगपूरचे सव्वा कोटी दरवर्षी ‘कचऱ्यात’

By admin | Updated: May 17, 2017 01:09 IST

कचऱ्याची समस्याकायमच : नव्या सभागृहाचे साडेचार महिने कचरा प्रश्नातच गेले, जागा नाही

संदीप बावचे ।  लोकमत न्यूज नेटवर्क  जयसिंगपूर : शहरात चांगली, दर्जेदार साफसफाई व्हावी, यादृष्टीने जरवर्षी प्रशासन घनकचरा विभागावर सव्वाकोटी रुपये खर्च करते. त्यातूनही अनेकवेळा शहर स्वच्छतेबाबत तक्रारी येतात. पालिकेच्या नव्या सभागृहाला नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कचऱ्याचा प्रश्नाला सामोरे जावे लागले. गेल्या साडेचार महिन्यापासून कचरा टाकण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. जयसिंगपूर शहरातील कचऱ्याचा जागेचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. शाहू आघाडीच्या प्रयत्नामुळे खामकर मळ्यातील बाळासाहेब देसाई यांच्या शेतात सध्या कचरा टाकला जात असला तरी दोन महिने कचरा टाकण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. येणाऱ्या काळात एकतर चिपरी हद्दीतील खणीत पूर्वीप्रमाणे कचरा टाकला जावा अथवा नवीन जागा पालिकेला घ्यावीच लागणार आहे. शहरातील सुमारे १६ टन कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर चिपरी गावच्या हद्दीत दोन एकर जागा पालिकेला मिळाली होती. दरम्यान, जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घणकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत आहेत. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरीक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने १ जानेवारी २०१७ चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध करीत कचरा डेपोसमोर चरखुदाई करुन रस्ता बंद केला. यामुळे गेल्या साडेचार महिन्यापासून शहरातील संकलित केलेल कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न आवासून उभा आहे. तात्पुरती पर्यायी जागा उपलब्ध झाली असलतरी येणाऱ्या काळात कचऱ्याचा प्रश्न उभा राहणार आहे.लोकसहभागाचा अभावकोणतीही चळवळ लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. नगरपालिकेने अनेकदा शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमात लोकसहभाग दिसला नाही. ओला व सुका कचरा वेगळा करावा. कचरा उघड्यावर कुठेही फेकू नये. कचरा घंटागाडीतच टाकावा. याबाबत जनजागृती मोहीम राबवूनही काही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. सफाई अभियानाचा देखावानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवानिमित्त १ एप्रिलपासून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. वर्षभर हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला होता. या अभियानातून काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात कचराकोंडाळे ओसंडून वाहत होत्या. इतरत्र कचरा पडला होता. मात्र, या प्रश्नाकडे चार दिवसात कोणीही मागे वळून पाहिले नाही.भाजीमंडई दुर्गंधीतअग्निशामक दलाचे विभागाशेजारीच भाजीमंडई आहे. अग्निशामक विभागाच्या पाठीमागील बाजूस कचरा गाड्या उभ्या केल्या जातात. या परिसरात खराब झालेल्या कचराकुंड्या टाकल्या आहेत. त्याठिकाणी पडलेला कचऱ्यामुळे भाजी मंडई दुर्गंधीच्या चक्रात सापडली आहे. घनकचऱ्याचे बजेटघनकचरा एकत्रिकरणासाठी पालिकेचे १ कोटी ३० लाख रुपयांचे बजेट आहे. दिवसाकाठी हिशेब झाल्या किमान २८ हजार रुपये इतका खर्च घनकचरा एकत्रिकरणासाठी करावा लागतो. सात घंटागाड्या, १४० कचराकुंड्या, दोन वाहन, ७५ हून अधिक सफाई कामगारांची संख्या आहे.