शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
2
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
3
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
4
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
5
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
6
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
7
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
8
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
9
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
10
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
11
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
12
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
13
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
14
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
15
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
16
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
17
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
18
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
19
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
20
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  

जयसिंगपुरात आॅनलाईन तक्रारी मांडता येणार

By admin | Updated: May 19, 2016 00:41 IST

सिस्टीमचा उद्या प्रारंभ : माझी पालिका ‘अ‍ॅप’ प्रणाली; राज्यात दुसरी, जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

संदीप बावचे --जयसिंगपूर --पथदिवे अ‍ॅटोमेटिक सिस्टीमद्वारे चालू बंद करण्याच्या स्काडा सिस्टीम प्रणालीनंतर आता जयसिंगपूर नगरपालिकेने ‘माझी पालिका’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन सिस्टीमप्रणाली सुरू केली आहे़ या सिस्टीमद्वारे प्रभागातील आॅनलाईन तक्रारी नगरपालिकेकडे मांडता येणार आहेत़ राज्यात जेजुरीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ही सिस्टीम राबविणारी जयसिंगपूर नगरपालिका पहिली ठरणार आहे़ शासनाच्या विविध योजनांतून नाट्यगृहे, भाजीमंडई, यात्री निवास, अग्निशामक केंद्र, जलवाहिनी, रस्ते यांसह कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात झाली आहेत़ वाढत्या शहरीकरणामुळे लोकसंख्येत देखील वाढ झाली आहे़ प्रभागातील नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने ‘माझी पालिका’ याअंतर्गत अ‍ॅन्ड्राईड अ‍ॅप्लिकेशन ही सिस्टीम सुरू केली आहे़ याअंतर्गत नागरिकांना आॅनलाईन तक्रारी मांडता येणार आहेत़ या तक्रारी फोटो अथवा व्हिडिओ क्लिपद्वारेदेखील अपलोड करता येणार आहेत़ ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाला तो मेसेज जाणार आहे़ त्यानंतर संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी काही कालावधी ठरविण्यात आला आहे़ तक्रारीनुसार काम झाले नाही, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसा मेसेज पोहोचणार आहे़अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपमध्ये सुमारे नऊ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत़ विभाग निवडा याअंतर्गत तक्रारींचा प्रकार, प्रभाग, क्षेत्र, तक्रार तपशील, फोटो किंवा व्हिडिओ क्लिप आॅनलाईन अपलोड करता येणार आहेत़ जन्म-मृत्यू दाखला देखील पाहता येणार आहे़ शिवाय प्रॉपर्टी कर, जुन्या तक्रारी त्यांची सद्य:स्थिती यामध्ये समजणार आहे़ नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य यांची नावे, मोबाईल नंबरदेखील यामध्ये पाहता येणार आहेत़ नगरपालिकेअंतर्गत झालेले प्रकल्प, चालू प्रकल्प व भावी प्रकल्प यांची माहितीदेखील अपलोड करण्यात आली आहे़ ज्याला ज्या रक्तगटानुसार रक्ताची गरज आहे, अशा गटाच्या व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबरदेखील उपलब्ध असणार आहेत़ या अ‍ॅप अंतर्गत जयसिंगपूर नगरपालिकेच्या फेसबुक, ट्विटर व वेबसाईडलादेखील भेट देता येणार आहे़ अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांकडून अभिप्राय व सूचनादेखील मांडता येणार आहेत़ एकूणच डिजिटल शहरासाठी पालिकेकडून राबविला जाणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे़ गैरप्रकार टाळता येणार‘माझी पालिका’ अंतर्गत असलेल्या या ‘अ‍ॅप’चा वापर शहरापुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे़ चुकीची माहिती आणि गैरप्रकार टाळण्यासाठी शहराबाहेर हा ‘अ‍ॅप’ उघडला जाणार नाही, अशी सिस्टीम यामध्ये वापरण्यात आली आहे़ उद्या, शुक्रवारी हा ‘अ‍ॅप’ जयसिंगपूर शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे़ ‘अ‍ॅप’ची सुविधा‘माझी पालिका’ याअंतर्गत अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन संदर्भातील माहिती डाऊनलोड करण्यासाठी संगणक विभागाला सुमारे एक महिनाभर यावर काम करावे लागले आहे़ पुणे येथील एका कंपनीने ‘अ‍ॅप’चे सॉफ्टवेअर करून दिले आहे़ गुगलवर गेल्यानंतर ‘जयसिंगपूर नगरपरिषद’, असे टाईप केल्यावर ‘माझी पालिका’ हा अ‍ॅप उपलब्ध होतो. त्यानंतर आपल्याला तो डाऊनलोड करता येणार आहे़