शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

जयसिंगपुरात स्वच्छता अ‍ॅप ठरले कूचकामी- अ‍ॅप सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:16 IST

गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अ‍ॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता

ठळक मुद्देआनलाईन तक्रारींचा निपटारा नाही : शहरात स्वच्छतेचा उडतोय बोजवारा;

संदीप बावचे ।जयसिंगपूर : गेल्या चार महिन्यांपासून जयसिंगपूर नगरपालिकेचा स्वच्छता अ‍ॅप बंदच आहे. त्यामुळे आनलाईन तक्रारींचा निपटारा होत नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. तांत्रिक कारणांमुळे अ‍ॅपवरील तक्रारी दिसत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असलेतरी स्वच्छता अ‍ॅप बंद असल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा फोल ठरत आहेत. शहर स्वच्छतेसाठी स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या या अ‍ॅपची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था बनली आहे.

स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी सहजरीत्या नोंदविता याव्यात, यासाठी डिजिटल माध्यम म्हणून स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता अ‍ॅपची सव्वा वर्षापूर्वी जयसिंगपूर पालिकेने सुरुवात केली होती. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित करून वेगवेगळ्या निकषाच्या आधारे पालिकांना मानांकन दिले जाते. स्वच्छता गुणवत्तेसाठी जयसिंगपूर शहराने सहभाग नोंदवून पालिकेकडून स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी जनजागृती केली होती. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत या अ‍ॅपचा वापर नागरिकांनी चांगल्या पध्दतीने केला होता.

दरम्यान, डिसेंबर २०१८ पासून तांत्रिक अडचणींमुळे स्वच्छता अ‍ॅपमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. नागरिकांकडून स्वच्छतेबाबत तक्रारी डाऊनलोड करून पाठविल्या जात असल्या तरी नगरपालिकेच्या इंजिनिअर्स अ‍ॅपमध्ये या तक्रारी दिसत नाहीत. त्यामुळे हे अ‍ॅप बिनकामाचे ठरले आहे. गेल्या चार महिन्यांपासून स्वच्छता अ‍ॅप बंद असल्याचे नगरपालिकेतून सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा निकाल देखील नुकताच लागला आहे. अ‍ॅप बंद असल्यामुळे त्याचे गुणही पालिकेला मिळालेले नाहीत. त्यामुळे किमान दैनंदिन तक्रारीसाठी हे अ‍ॅप सुरू करावे, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.अ‍ॅपचा फायदाशहरातील कुठल्याही भागात कचरा दिसल्यास नागरिकांना तक्रार करता येते. याशिवाय घंटागाडी आली नाही, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, सार्वजनिक शौचालयात पाणी नाही, कचऱ्याचे ढीग, गटारी तुंबल्या यासह विविध तक्रारी याबाबतचे छायाचित्र काढून स्वच्छता अ‍ॅपवर टाकल्यास पालिकेकडून त्यावर कारवाई करणे हा उद्देश आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे हा स्वच्छता अ‍ॅप बिनकामाचा ठरला आहे.तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणीस्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी सव्वा वर्षापूर्वी जनजागृती करण्यात आली होती. मात्र, ज्यांना अ‍ॅपबद्दल माहिती नाही, ते नागरिक थेट तोंडी किंवा लेखी तक्रार देत आहेत. त्यांच्या तक्रारीचे निरसन केले जात आहे. डिजिटल माध्यमातून तक्रारीचा हा उपक्रम फोल ठरला आहे. शहर स्वच्छ ठेवण्याचा सोपा उपाय अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना मिळाला होता. मात्र, अ‍ॅपच बंद असल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण उद्देश असफल ठरत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर