संदीप बावचे ल्ल जयसिंगपूरसांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत जयसिंगपूर-उदगाव व तमदलगे-अंकली मार्गावर रखडलेल्या रस्त्याच्या कामाला पुन्हा दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर रेल्वेस्थानकाजवळील रस्त्याचे तात्पुरते काम सुरू झाले आहे. मात्र, या दोन्ही बायपास मार्गांवर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दोन महिन्यांनंतर निविदा निघणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता निविदेची वाट पाहावी लागणार आहे. चार वर्षांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गांतर्गत तमदलगे बसवान खिंड ते अंकली रस्ता सुप्रीम कंपनीकडे वर्ग केला होता. सध्या येथील काम बंद आहे. जैनापूर येथे चौपदरीकरणांतर्गत कामच झालेले नाही. शिवाय निमशिरगावच्या शाळा स्थलांतराचा प्रश्नदेखील भिजत पडला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना धुळीमुळे रस्त्याकडील शेती पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रस्त्याचे काम अर्धवट असतानादेखील सुप्रीम कंपनीकडून टोल नाका सुरू करण्याची घाई झाली होती. ३४० कोटी रुपये या रस्त्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. ठेकेदार कंपनीकडून तमदलगे बसवान खिंड ते अंकली या मार्गावरील कामे अर्धवट झाली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, अंकली टोल नाक्यापासून तमदलगेकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर ९०० मीटर रस्त्याचे काम झाले आहे. निविदेनंतरच मुहूर्तसांगली-कोल्हापूर महामार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे. येत्या दोन महिन्यांत निविदा निघाल्यानंतर रस्त्यावरील प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली महामार्गावर प्रलंबित कामांना निविदा निघाल्यानंतरच मुहूर्त मिळणार आहे.रेल्वेस्थानकाजवळ खडीकरणजयसिंगपूर रेल्वेस्थानकाजवळील व चिपरी-जैनापूर हा रस्ता सुप्रीम कंपनी व बांधकाम विभागाच्या वादात अडकला आहे. अंदाजे ८०० मीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे दानोळी, कोथळी, कवठेसार, उमळवाड, जैनापूर या गावांतील नागरिकांना सोयीस्कर असणारा हा रस्ता वाहतुकीस अडचणीचा ठरला होता. अनेक तक्रारीनंतर याठिकाणी खडीकरणाचे काम सुरू झाले आहे.
जयसिंगपूर, तमदलगे बायपासची प्रतीक्षा
By admin | Updated: January 17, 2017 00:29 IST