शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरात एस.टी.वर दगडफेक: मराठा आरक्षण प्रश्नाचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 01:02 IST

जयसिंगपूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरात उमटले. अज्ञातांनी बसस्थानक शेजारी असणाऱ्या क्रांती चौकात एस.टी.वर दगडफेक केली. एस.टी.वर झालेल्या दगडफेकीमुळे येणाºया बसेस बसस्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय झाली. या गोंधळामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप ...

जयसिंगपूर : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरात उमटले. अज्ञातांनी बसस्थानक शेजारी असणाऱ्या क्रांती चौकात एस.टी.वर दगडफेक केली. एस.टी.वर झालेल्या दगडफेकीमुळे येणाºया बसेस बसस्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय झाली. या गोंधळामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.मराठा समाजाला संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत, त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे, असा इशारा देत मराठा समाजबांधवांच्यावतीने आंदोलने सुरु झाली आहेत. येथील सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात लाक्षणिक आंदोलनासाठी आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, मराठा आंदोलनाचे पडसाद रविवारी जयसिंगपूरातही उमटले. कुरुंदवाडहून सांगलीकडे निघालेल्या एस.टी. (क्र.एमएच ४० एन ९३४७) वर क्रांती चौकात दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एस.टी.दर्शनी बाजूची काच फुटली. अज्ञातांनी केलेल्या अचानक या दगडफेकीमुळे महामार्गावर तणावपूर्ण वातावरण बनले होते. एस.टी.वर दगडफेक झाल्याचे वृत्त समजताच सांगलीहून कोल्हापूरकडे येणाºया बसेस येथील बसस्थानक परिसरात थांबविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी वर्गाची मोठी गैरसोय झाली. सुमारे तासभर हा गोंधळ सुरु होता. महामार्गावरदेखील मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. अखेर जयसिंगपूर पोलिसांनी हस्तक्षेप करुन वाहतुक सुरळीत करुन बसेस मार्गस्थ केल्या. कुरुंदवाड आगाराचे एस.टी.चालक नितीन वाघमारे यांनी एस.टी.नुकसानप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.