शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

जयसिंगपूरची कन्या बनली अमेरिकेची नगरसेविका; न्यू जर्सीमधील निवडणुकीत रचला इतिहास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 14:49 IST

जयसिंगपूर : अमेरिकेतील न्यूजर्सी भागात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणुकीत होपवेल टाऊनशिपमध्ये नगरसेविका म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर ...

जयसिंगपूर : अमेरिकेतील न्यूजर्सी भागात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदीय निवडणुकीत होपवेल टाऊनशिपमध्ये नगरसेविका म्हणून जयसिंगपूरची कन्या उर्मिला जनार्दन अर्जुनवाडकर निवडून आल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की यांचा एक हजार मतांनी पराभव केला. होपवेल टाऊनशिपच्या तीनशे वर्षांच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही उर्मिला यांना मिळाला आहे.

उर्मिला या चौथ्या गल्लीतील विजया व जनार्दन अर्जुनवाडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण जयसिंगपूरमध्ये झाले. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचे वास्तव्य अमेरिकेतील न्यूजर्सी राज्यातील होपवेल येथे असून, त्या गेल्या २५ वर्षांपासून औषध निर्मिती कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन कार्य आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिके आणि परिषदांमध्ये प्रसिध्द झाले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची झोनिंग व ॲडजस्टमेंट बोर्डवर सहाय्यक सदस्य म्हणून नेमणूक केली गेली. सहा वर्षांपासून टाऊनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे काम त्या पाहात आहेत. त्यामुळे त्यांना टाऊनशिपच्या समस्या आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान व सखोल जाण निर्माण झाली आहे. त्यातूनच त्यांना या निवडणुकीत उभे राहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी या निवडणुकीत यश मिळवून जयसिंगपूरचा आणि भारताचा झेंडा फडकवला. या निवडणुकीत त्यांना ३,७०१ मते मिळाली. त्यांचा शपथविधी कार्यक्रम जानेवारीमध्ये होणार आहे.

सामाजिक कार्यात सहभाग

-उर्मिला यांनी न्यूजर्सी येथे महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती, परंपरा व मराठी भाषा जतन व संवर्धनासाठी मराठी शाळा व संस्कार वर्गाची सुरुवात केली.-तसेच त्यांच्याकडे गणपती उत्सव ही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.-गर्ल स्काऊट्स - लीडर, पालक - शिक्षक संघटना पदाधिकारी, होपवेल व्हॅली फूड पँट्री आणि ए टू झेड मार्गदर्शन उपक्रम या स्थानिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUSअमेरिकाElectionनिवडणूक