राधानगरी : राधानगरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या जयश्री यशवंत कळमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच कविता शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. ग्रामविकास अधिकारी एम. आर. गुरव यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली.
आनंदी यशवंत पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. निवडीनंतर झालेल्या कार्यक्रमात सरपंच कविता शेट्टी यांनी कळमकर यांचा सत्कार केला. यावेळी सदस्य, महेश आडसुळ, शत्रुघ्न सांगावकर, सचिन पालकर, मिथुन पारकर, संजय कांबळे, रामराव टेपुगडे, कविता चांदम, भाग्यश्री पाटील, सरिता बालनकर, भारती कुंभार यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम पाटील, भिकाजी हळदकर, दीपक शेट्टी, बाळासोा कळमकर, प्रकाश बालणकर आदी उपस्थित होते.
२६ जयश्री कळमकर