कोल्हापूर : जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओप्रश्नी येत्या आठवड्यात नगरविकास विभागात बैठक घेऊन या स्टुडिओचे अस्तित्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी दिले.
नगरविकास विभागाने शालिनी सिनेटोनप्रश्नी विकासकाला बांधकाम परवाना द्या, असा आदेश दिल्याने चित्रपट व्यावसायिकांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या पुढाकाराने खासदार माने यांची भेट घेऊन निवेदन आणि सविस्तर माहिती दिली. यावेळी खासदार माने यांनी पुढील आठवड्यात याबाबत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, रणजित जाधव, सतीश बिडकर, राहुल राजशेखर, आनंद काळे, सुरेखा शहा, अर्जुन नलवडे, छाया सांगावकर, रोहन स्वामी, अजय कुरणे, अवधूत जोशी, मंजित माने, स्मिता सावंत, अमर मोरे, अशोक माने, अमर मठपती, रवींद्र बोरगावकर, अरुण भोसले- चोपदार, अनिल चोपदार उपस्थित होते.
--
फोटो नं २२०६२०२१-कोल-शालिनी स्टुडिओ
ओळ : कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोनप्रश्नी मंगळवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली.
---