शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

‘दौलत’साठी जयंत पाटील उत्सुक

By admin | Updated: July 11, 2015 00:06 IST

‘गुगली’ने उलट-सुलट चर्चा : चंदगडकरांचा रोष पत्करावा लागणार

कोल्हापूर : हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना विकत घेण्यास राष्ट्रवादीचे नेते व आमदार जयंत पाटील उत्सुक आहेत. जिल्हा बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केल्यानंतर आमदार पाटील यांनी तो चालविण्यास घेण्याची ‘गुगली’ टाकल्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. ते कारखाना विकत घेण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. कारखाना चार हंगाम बंद आहे. कारखान्यावर साडेतीनशे कोटींचे कर्ज आहे. ‘दौलत’ला दिलेल्या कर्जवसुलीचे जिल्हा बँकेसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने कर्जापोटी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी तीन वेळा निविदा काढली. मात्र, तो चालविण्यास घेण्यासंबंधी एकही निविदा आली नाही. शेवटचा मार्ग म्हणून बँकेने कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. कारखाना विक्रीला ‘दौलत बचाव कृती समिती’चा विरोध आहे. ‘जागा विका; पण कारखाना वाचवा,’ असाही प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात कृती समितीने दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये कारखाना विकत घेणार म्हटल्यानंतर चंदगडकरांचा रोष पत्करावा लागणार आहे. बंद कारखान्याला मदत करण्याची जिल्हा बँकेची आर्थिक कुवत राहिलेली नाही. त्यामुळे कारखाना जयंत पाटीलच विकत घेतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्हा बँकेने सुलभ हप्ते पाडून दिल्यास ‘दौलत’ चालवायला घेऊ, असे जयंत पाटील यांनी जाहीरपणे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते कारखाना चालविण्यास उत्सुक आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.- डॉ. नंदा बाभूळकर, नेत्या, राष्ट्रवादीबँकेने तीन वेळा निविदा काढली त्यावेळी जयंत पाटील यांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे कारखाना चालवायला नव्हे तर विकत घेण्यासच ते उत्सुक असल्याचे स्पष्ट होते. पहिल्यादांच विकत घेणार म्हटल्यावर चंदगडकरांचा रोष पत्करावा लागणार आहे. ‘चालविण्यास घेणार’ असे सांगत ते विकत घेतील.- राजेंद्र गड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना