शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या गाडीत जयकुमार..

By admin | Updated: May 9, 2017 00:05 IST

उदयनराजेंना कमळाचा हार ! : दोन राजकीय घटनांच्या चर्चेने सातारा जिल्हा ढवळला

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘न भूतो.. न भविष्यती’ अशा दोन राजकीय घटनांच्या चर्चेने सोमवारी संपूर्ण सातारा जिल्हा ढवळून निघाला. माणदेशातील बिदाल गावी श्रमदानाची पाहणी करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गाडीतून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी प्रवास केला, तर ‘राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाचा त्याग करून थेट भाजपमध्ये प्रवेश करावा,’ असा दबाव खासदार समर्थकांकडून वाढला. ‘राजे भाजपच्या वाटेवर,’ अशा पोस्टही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर फिरल्या.राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी माण तालुक्यातील बिदाल व किरकसाल येथील श्रमदानाच्या कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक व काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेही त्यांच्या समवेत होते. या काळात जयकुमार यांनी तालुक्यातील जलसंधारणांच्या कामांची माहिती खासदार शरद पवार यांनाही दिली. या दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व गोरे यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उभारलेले आमदार बंधू शेखर गोरे मात्र या दौऱ्यात नव्हते. आजपर्यंत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना अडचणीत आणण्याची एकही संधी जयकुमार यांनी सोडली नव्हती. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गाडीतून जयकुमारांचा प्रवास राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला. राजे, बाहेर पडा.. कार्यकर्त्यांचा वाढता दबाव१ नगरपालिका अन् जिल्हा परिषद निवडणुकांपासून एकाच वेळी रामराजे अन् शिवेंद्रसिंहराजेंसह राष्ट्रवादीतील इतर नेत्यांशी पंगा घेणाऱ्या खासदार उदयनराजेंना सध्या कायद्याची लढाई लढावी लागत आहे. २ ‘ज्या पक्षातील नेत्यांमुळे आपण अडचणीत आलो आहोत, त्या राष्ट्रवादीला रामराम ठोकून सत्ताधारी भाजप पक्षात प्रवेश करावा,’ असा दबाव राजे समर्थकांकडून वाढत चालला आहे. ‘राजे भाजपच्या वाटेवर,’ अशा पोस्टही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर फिरू लागल्या आहेत.३ मात्र, सध्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात नसलेल्या उदयनराजेंची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच आहे. या गटाचा निर्णय जवळपास निश्चित झाला असला तरी सातारा लोकसभा मतदारसंघात मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाणे कोणालाच परवडणारे नसल्याने हा निर्णय काही काळानंतर घेतला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.