गडहिंग्लज : जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना बुधवार (२) रोजी वीरगती प्राप्त झाली.मंगळवारी (१) रात्रीच्या सुमारास काश्मीरच्या ६२ आरआर पोस्टींगवरील बारामुल्ला (उरी) सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत चेतन हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सैनिक रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.लहानपणीच चेतनच्या आई-वडीलांचे निधन झाले आहे. चेतन व त्याचा लहान भाऊ दयानंद या दोघांचे पालनपोषण त्यांच्या आत्या शोभा बाबू गुंडाळी (रा. हेब्बाळ, ता. हुक्केरी) यांनी केले आहे.चेतनचे बारावीपर्यंतचे शिक्षण डी.एल. खोत ज्युनिअर कॉलेज हेब्बाळ येथे झाले होते. २०१४ मध्ये नाशिक येथे सैन्यदलात चेतन भरती झाले. दोन महिन्यापूर्वी ते सुट्टीवर गावी आले होते. नेर्लीमध्ये चेतन यांची शेती असून वर्षभरापूर्वी बसवान मंदिर रोडलगत त्यांनी नवीन घर बांधले आहे.चेतन शहीद होण्याने गावात शोककळा पसरली आहे. आज (शुक्रवारी) चेतन यांच्या पार्थिवावर गावातील कावेरी हायस्कूलजवळील पाटील शेतवडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिस व महसूल प्रशासन आणि ग्रामस्थाकडून लाडक्या सुपूत्राच्या अंत्यविधीची तयारी सुरू आहे.कुटुंबीय देशसेवेतचेतन यांचे वडील बसवराज हेदखील सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे २० वर्षापूर्वी निधन झाले आहे. लहानपणापासून आई-वडीलांच्या मायेला पोरक्या झालेल्या चेतन हा सैन्यदलात तर त्याचा लहान भाऊ दयानंद हाही नौदलात आहे. मात्र, सेवा बजावताना चेतनला वीरगती प्राप्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मिरमध्ये शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 10:23 IST
belgaon, kolhapur, Karnatak, IndianArmy जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला-उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या चकमकीत नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसवराज पाटील (वय २६, रा. नेर्ली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांना बुधवार (२) रोजी वीरगती प्राप्त झाली.
बेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मिरमध्ये शहीद
ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यातील जवान जम्मू-काश्मिरमध्ये शहीदसंकेश्वरनजीकच्या नेर्लीचा सुपूत्र : शासकीय इतमामात आज अंत्यविधी