शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग!

By admin | Updated: July 23, 2016 00:05 IST

नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग : ‘बाहेरून शह अन् आतून तह’वरच लक्ष; आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरणार

जयसिंगपूर : आगामी पालिका निवडणुकीसाठी जयसिंगपुरात मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. नगरपालिकेच्या २४ जागांसाठी निवडणूक होणार असून, आजी-माजी नगरसेवक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या ‘निवडणुकीचे रणशिंग अन् गुडघ्याला बाशिंग’ बांधणारे बाहेरून शह आतून तह करणार काय? याबरोबरच दोन्ही काँग्रेसची आघाडी व स्वाभिमानी, भाजप, महाडिक गट, शिवसेना समोरासमोर उभे ठाकणार का? या चर्चेने मात्र सध्या जयसिंगपूर शहरात राजकीय वातावरण गरमागरम झाले आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार जयसिंगपूर शहराची लोकसंख्या ४८ हजारांच्या आसपास आहे. चार हजार लोकसंख्या गृहीत धरून १२ प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभागनिहाय आरक्षणदेखील निश्चित झाले आहे. सध्या पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजप व शिवसेना पक्ष सत्तेत असल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभागरचना आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड हा पॅटर्न नगरपालिका निवडणुकीत राबविला जाणार आहे. विधान परिषदेनंतर जिल्ह्यात महाडिक पॅटर्न नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ‘एंट्री’ करणार आहे. एकहाती सत्तेमुळे सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी महाडिक गट भाजपबरोबर आघाडी बांधण्याच्या तयारीत असल्याचे समजते. लवकरच ही आघाडी मूर्त स्वरूप घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आरक्षणानंतर आजी-माजी नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आघाडीकडे सध्या इच्छुकांची संख्या मोठी दिसून येत आहे. यामुळे नेत्यांसमोर निवडणुकीवेळी पेच निर्माण होणार आहे. एकूणच आरक्षणानंतर आजी-माजी नगरसेवकांनी सुरू केलेली मोर्चेबांधणी आणि आघाड्या कशा असणार? याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे. (प्रतिनिधी)आघाड्यांकडे लक्षनुकत्याच झालेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह, राष्ट्रवादी, स्वाभिमानी, शिवसेना, बहुजन विकास आघाडी यांनी मोट बांधून भाजपला सत्तेपासून रोखले.बाजार समितीच्या निवडणुकीत हे प्रमुख पक्ष एकत्र आले असले तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय चित्र वेगळे असणार आहे. शह, काटशहच्या राजकारणात कोण बाजी मारणार? याकडे जयसिंगपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.