शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मतदान उत्साहात सुरू; पण अनेक ठिकाणी EVM बंद, गोंधळाची स्थिती
2
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा अधिकार; कुणाला मतदान करायला हवं? हेही सांगितलं
3
अबू धाबीमध्ये भारताच्या सरकारी तेल कंपन्यांना सापडला खजिना; 'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल'ला सापडले तेलाचे नवीन साठे
4
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
मस्क यांच्यावर डॉलर्सचा पाऊस, एकाच दिवसात संपत्तीत ४२.२ अब्ज डॉलर्सची वाढ
6
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
7
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
8
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
9
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
10
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
11
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
12
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
13
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
14
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
15
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
16
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
17
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
18
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
19
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
20
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

OBC Reservation : भाजप ओबीसी मोर्चातर्फे जनआक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:31 IST

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व ...

ठळक मुद्देभाजप ओबीसी मोर्चातर्फे जनआक्रोश आंदोलन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मुद्दा

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे हे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने गुरुवारी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.संदीप कुंभार म्हणाले, या आरक्षण रद्द निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ओबीसी समाजासाठी ह्ललवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा, असे आदेश दिले होते. याला पंधरा महिने झाले तरीही अजून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापनाही करण्यात आलेली नाही.राहुल चिकोडे म्हणाले, ज्या गोपीनाथ मुंडे यांनी मोठा संघर्ष उभारून ओ.बी.सी. समाजाला अनेक सवलती मिळवून दिल्या. त्यांच्या स्मृतीदिनी आम्ही हे आंदोलन छेडले आहे. केवळ ठाकरे सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे आरक्षण रद्द झाले आहे.यावेळी भाजप सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई, ओ.बी.सी. महिला मोर्चा प्रमुख विद्या बनछोडे यांची भाषणे झाली.यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप मेत्राणी, दिग्विजय कालेकर, विजय आगरवाल, महेश यादव, राजाराम परिट, अरविंद वडगावकर, दीपक पेटकर, प्रकाश कालेकर, सतीश यादव, संजय खेडकर, श्रीशैल्य स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणBJPभाजपाkolhapurकोल्हापूर