शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

जल्लोष नडला : हवेत गोळीबार करणाऱ्या उचगावच्या तरुणास अटक-- बंदुकीसह चार रिकाम्या पुंगळ्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 14:09 IST

शिंदे हा शिरोली एमआयडीसी येथे खासगी नोकरी करीत होता. काही वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती. काही कामधंदा करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोल्हापूर : पन्नास किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयी झालेल्या भाच्याच्या जल्लोषात सद्गुरू कॉम्प्लेक्स उचगाव (ता. करवीर) येथील भरवस्तीमध्ये दिवसा हवेत गोळीबार करून जल्लोष साजरा करणा-या तरुणास गांधीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित अश्विन बाळासो शिंदे (वय ३७) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून बारा बोअरची बंदूक आणि चार रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या. त्याने चारवेळा गोळीबार केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे, अशी माहिती करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

रविवारी (दि. ९) सकाळी ही स्पर्धा झाली. त्यामध्ये ५० किलोमीटर स्पर्धेत विजयी झालेला स्पर्धक अमेय देसाई हा घरी गेल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाच्याच्या जल्लोषात अश्विन शिंदे याने आपल्या बंदुकीतून हवेत चारवेळा गोळीबार करून जल्लोष केला. अचानक गोळीबाराचा आवाज झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी दरवाजे बंद करून घेतले. संशयित शिंदे याच्या नातेवाईक महिलेने गोळीबाराचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर प्रसारित केला. यासंदर्भात बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. तत्काळ पोलिसांच्या पथकाने उचगावमध्ये शिंदेच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेऊन बंदूक जप्त केली. गोळीबार करताना उपस्थित लोकांचे जबाबही पोलिसांनी घेतले. शिंदे हा शिरोली एमआयडीसी येथे खासगी नोकरी करीत होता. काही वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती. काही कामधंदा करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.परवाना रद्द करण्यासाठी प्रस्तावअश्विन शिंदे याचा बंदूक परवाना आहे. शस्त्र हाताळण्याचे ज्ञान असतानाही त्याने राहत्या घरासमोर रस्त्यावर नागरिक आणि मुलांसमोर बेकायदेशीर हवेत गोळीबार केला आहे. त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक