शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलसमाधी आंदोलन : कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 13:13 IST

कोल्हापूर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी कोल्हापुरात आज, सकाळी पंचगंगा घाटावर एसटी कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार होते. ...

कोल्हापूर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी कोल्हापुरात आज, सकाळी पंचगंगा घाटावर एसटी कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र, जलसमाधी घेण्यास निघालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. आंदोलनाचा १२ वा दिवस उजाडला तरीही सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील एसटी कर्मचारी संतप्त झाले असून हे आंदोलन अधिक तीव्र होतानाचे चित्र दिसत आहे.तर दुसरीकडे सरकारकडून या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळ केपीएमजी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सरकारकडून अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तर एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र काही कर्मचारीच कामावर हजर झाले. यामुळे आंदोलनात फूट पडली. याचे पडसाद अनेक ठिकाणी दिसून आले. राज्यात अनेक ठिकाणी एसटीवर दगडफेक तर कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या.कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात १२ व्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. तरीही सरकार मागण्यांकडे दुर्लक्षच करीत राहिल्याने त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यातूनच त्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी वेळीच सावध होत आंदोलन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.दरम्यान, एसटी प्रशासन रोजंदारी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुरुंदवाड, गगनबावडा, गडहिंग्लज आगारातून प्रत्येकी एक बस विविध मार्गावर सोडली. प्रशासन रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देऊन कामावर रूजू होण्यास भाग पाडत आहे. पण त्यास इतर कर्मचारी विरोध करीत आहेत. यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप