जयसिंगपूर : गणेशमूर्ती विसर्जनावेळी उदगाव (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीपात्रात तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तानाजी सर्जेराव नेर्लेकर (३०, रा. जयसिंगनगर, नांदणी रोड जयसिंगपूर) असे मृताचे नाव आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, नेर्लेकर हे नागराज मित्र मंडळ येथील गणपती विसर्जन करण्याकरिता उदगांव येथील कृष्णा नदीपात्रात गेले होते. पाण्याच्या प्रवाहाने पाय घसरल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबतची वर्दी सुरेश बापू मोहिते यांनी दिली. अधिक तपास सहाय्यक फौजदार कोरवी करीत आहेत. नेर्लेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. तानाजी खासगी नोकरी करीत होता. कुटुंबाची त्याच्यावरच जबाबदारी होती. त्याच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
फोटो - २००९२०२१-जेएवाय-०२-मृत तानाजी नेर्लेकर