शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘जयशंकर दानवे’ अर्थात चित्रपटसृष्टीचा एक कालखंड :चंद्रकांत जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 17:34 IST

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कुटुंबीयांतर्फे  शाहू स्मारक भवन येथे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भास्कर जाधव होते.

ठळक मुद्दे‘जयशंकर दानवे’ अर्थात चित्रपटसृष्टीचा एक कालखंड :चंद्रकांत जोशीनटश्रेष्ठ जयशंकर दानवे संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांनी हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत साकारलेला खलनायक, चरित्र अभिनय, सहदिग्दर्शन आणि तत्कालीन परिस्थिती हा कालखंड संकेतस्थळाच्या रूपाने आजच्या पिढीसमोर येत आहे. ही बाब म्हणजे मुलांकडून वडिलांचा केला जाणारा कृतज्ञतापूर्वक गौरवच म्हणावा लागेल. हा कालखंडच जणू मंतरलेला होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी केले. दानवे यांच्या कुटुंबीयांतर्फे  शाहू स्मारक भवन येथे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भास्कर जाधव होते.जोशी म्हणाले, आजच्या पिढीला राणी एलिझाबेथ, व्हिक्टोरिया, लॉर्ड कॅनिंग अशा इंग्रजांच्या काळातील नावे व सनावळ्या तोंडपाठ आहेत. मात्र, आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचा इतिहास माहीत नाही. ही बाब जाणून त्यांच्या कन्या जयश्री आणि मुलगा राजवर्धन यांनी ते दिसायचे कसे, त्यांच्या अभिनयाची शैली, त्यांचे संवादफेक कौशल्य आणि त्यांचे मराठी रंगभूमी व मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील वेगवेगळे पैलू या संकेतस्थळाच्या रूपाने नव्या पिढीसमोर मांडले आहेत. ही बाब म्हणजे त्यांची कारकिर्द नव्हे, तर त्यांचा कालखंड जगासमोर आणणे होय. ही काळाची गरज आहे. म्हणून त्यांचे काम म्हणजे वडिलांप्रती असलेले प्रेम अर्थात वडिलांचा कृतज्ञतापूर्वक गौरव असेच म्हणावे लागेल.ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, जयशंकर दानवे म्हणजे सहकलाकारांना सांभाळून घेणारे, फणसासारखे वरून काट्यासारखे आणि आतून गोड, रसाळ गराचे असे कलावंतांचे दैवत होते.अध्यक्षस्थानावरून बोलताना जाधव म्हणाले, दानवेकाकांच्या खलनायकाचे अनुकरण केल्याशिवाय मराठी सिनेमा आजही पूर्ण होत नाही. जयश्री दानवे यांनी स्वागत, तर राजवर्धन दानवे यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर