शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
5
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
6
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
7
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
8
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
9
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
10
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
11
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
12
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
13
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
14
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
15
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
16
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
17
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
18
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
19
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
20
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना

शाहिरी पोवाड्यांतून शिवरायांच्या विचारांचा जागर

By admin | Updated: April 20, 2015 00:21 IST

आपल्या घराकडे व कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तववादी चित्र त्यांनी आपल्या शाहिरीतून यावेळी मांडले.

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या राज्यात परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. कारण शिक्षाच तशी जरबेची होती, पण आता दररोज वर्तमानपत्रांची पाने उलगडल्यावर बलात्काराच्या घटना दिसतात. त्याला कारण गुन्हेगाराला कुणाचाच धाक राहिलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा शिवशाहीच्या विचारांचा जागर होण्याची गरज आहे, असे आवाहन शाहिरांनी आपल्या पोवाड्यांतून रविवारी सायंकाळी केले. ऊर्जामयी पोवाड्यांतून शिवरायांच्या विचारांच्या जागराने शिवभक्तांमध्ये रोमांच उभे राहिले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिरजकर तिकटी येथे मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त ज्येष्ठ शाहीर शंकर पाटील (दिंडनेर्ली), शिवशाहीर निवृत्ती कुंभार (बामणी) व सहकाऱ्यांचा शाहिरी पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रमुख पाहुणे बाबासाहेब देशमुख (सांगोला) यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती आदिल फरास, बाबूराव चव्हाण, निवासराव साळोखे, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, राजेंद्र ठोंबरे, प्रवीण मोहिते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठ शाहीर शंकर पाटील यांच्या पोवाड्यांतून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करीत शिवरायांमुळेच शाहिरांच्या डफाला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाल्याचे सांगितले. जगात अनेक राजे होऊन गेले, परंतु शिवराय हे एकमेव राजे होते की ज्यांना ‘छत्रपती’ ही पदवी आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठीच शाहिरी जन्माला आल्याचे सांगून शाहीर पाटील यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, नेताजी बोस यांची गौरवगाथा आपल्या शाहिरी पोवाड्यांतून मांडली.शाहीर निवृत्ती कुंभार यांनी स्वर्गीय शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा ‘स्वराज्याचे तोरण’ हा पोवाडा सादर करून उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर रोमांच उभे केले. सध्याच्या महिला या टी.व्ही. मालिकांमध्ये इतक्या गुंतल्या गेल्या आहेत, की त्यांचे आपल्या घराकडे व कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तववादी चित्र त्यांनी आपल्या शाहिरीतून यावेळी मांडले. (प्रतिनिधी)