शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाठीकाठी, धनगरी ढोल, वारकरी ठरले आकर्षण ; हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात जगन्नाथ रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 10:18 IST

ऐतिहासिक दसरा चौकामध्ये महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, मुंबई येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान कृष्णानंद प्रभू यांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन झाले. आकर्षक अशा फुलांनी रथाची सजावट करण्यात आली होता.

कोल्हापूर : ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या गजरात गुरुवारी कोल्हापुरातून जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. मर्दानी खेळ, धनगरी ढोल, वारकऱ्यांचा टाळ-मृदंग अशा पारंपरिक लोककला रथाचे वैशिष्ट्य ठरल्या. यावेळी इस्कॉन रथयात्रा समितीच्या सदस्यांसह भाविकांनी ऐतिहासिक दसरा चौक ते रंकाळा तलाव परिसरातील हरिओमनगर येथील मंदिरापर्यंत दोरखंडच्या साहाय्याने रथ ओढण्यात आला.

जगन्नाथपुरी (उडिसा) येथे जगन्नाथ रथयात्रेचा सर्वांत मोठा लोकोत्सव असतो. याच पार्श्वभूमीवर ‘इस्कॉन’चे संस्थापक प्रभुपाद यांनी १९६६ पासून जगभरात ही रथयात्रा सुरू केली. करवीरवासीयांवर कृपावर्षाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने (इस्कॉन) दरवर्षी कोल्हापुरातही भव्यदिव्य स्वरूपात जगन्नाथ यात्रा काढली जाते. यंदाची रथयात्रा गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. ऐतिहासिक दसरा चौकामध्ये महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, मुंबई येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान कृष्णानंद प्रभू यांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन झाले. आकर्षक अशा फुलांनी रथाची सजावट करण्यात आली होता. भक्तांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या जयघोषात रथ ओढला. यावेळी करवीरनगरीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दसरा चौक येथून रथयात्रा लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, शाहू टॉकीज, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, रंकाळा टॉवर, शालिनी पॅलेसमार्गे हरीओमनगर येथील ‘इस्कॉन’चे मंदिर अशी निघाली. यावेळी केशव विलास दास, शाम भक्त दास, जयानंद दास, धर्मशास्त्र दास, रूपविलास दास, प्रियसखा दास, अर्जुनप्राण दास उपस्थित होते.पारंपरिक वाद्ये ठरली आकर्षणमर्दानी खेळाची प्रात्यक्षिकांसह लेझिम, धनगरी ढोल अशा पारंपरिक वाद्य रथयात्रेचे आकर्षण ठरले. कृष्ण, राधा, राम यांच्या वेशभूषेमध्ये बालचमू उपस्थित होते. रथयात्रेत भगवंताच्या लीला नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. बैलगाड्यांवर रथयात्रेबाबतची माहिती, देशविदेशांत होणाºया रथयात्रा यांचे फलक लावण्यात आले होते. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर