शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जॅकवेलचे नवे ‘खर्चिक’ डिझाईन यापूर्वीच नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:11 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणात बांधण्यात येणाºया जॅकवेलचे नवे डिझाईन पुढे आणून थेट पाईपलाईन योजनेची किंमत वाढविण्याचा काहींनी संगनमताने केलेला प्रयत्न उधळून लावला आहे. हे जॅकवेल अधिक भक्कम करण्याच्या नावाखाली १८ कोटी रुपये खर्चाची किंमत ३० ते ३२ कोटींपर्यंत वाढविण्याचे नवे डिझाईन कोल्हापूर महानगरपालिकेने दि. ९ जून २०१७ रोजीच नाकारले आहे. ...

ठळक मुद्देमहापालिकेवर अतिरिक्त पडणारा बोजा वाचला

कोल्हापूर : काळम्मावाडी धरणात बांधण्यात येणाºया जॅकवेलचे नवे डिझाईन पुढे आणून थेट पाईपलाईन योजनेची किंमत वाढविण्याचा काहींनी संगनमताने केलेला प्रयत्न उधळून लावला आहे. हे जॅकवेल अधिक भक्कम करण्याच्या नावाखाली १८ कोटी रुपये खर्चाची किंमत ३० ते ३२ कोटींपर्यंत वाढविण्याचे नवे डिझाईन कोल्हापूर महानगरपालिकेने दि. ९ जून २०१७ रोजीच नाकारले आहे. त्याऐवजी आर्थिकदृष्ट्या परवडेल असे नवे डिझाईन करण्याचा सल्ला महापालिकेने ‘युनिटी’ला दिला आहे.शहराला पाणीपुरवठा करणाºया थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामात खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरवासीयांसाठी ही पाणी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचे काम युनिटी कन्सल्टंटला दिले आहे, तर जीकेसी ही ठेकेदार कंपनी काम करत आहे, पण ही योजना सुरू झाल्यापासून विविध कारणांस्तव वादाच्या भोवºयात सापडली आहे. प्रथम विविध परवानग्यांपाठोपाठ मार्गावरील गावांचा विरोध, त्यानंतर ठिकपुर्ली येथील लोखंडी पूल अशा अनेक कारणांनी ही योजना गाजत आहे.ठिकपुर्ली येथील सुमारे अडीच लाख रुपये खर्चाच्या लोखंडी पुलावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च दाखविला होता, पण महापालिकेतील विरोधी आघाडीने या खर्चाचा भंडाफोड करून प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यामुळे योजनेत सुरू असलेल्या गैरप्रकाराला काहीअंशी चाप बसला आहे. या पुलाच्या वाढीव खर्चाची रक्कम आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वसूल केली, पण आता काळम्मावाडी धरणात बांधावयाच्या जॅकवेलचा नवा प्रश्न महापालिकेसमोर उभारला होता.यापूर्वी ‘युनिटी’ने या जागेत जॅकवेल उभारणीसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता, पण आता ‘युनिटी’नेच जॅकवेलचे नवे डिझाईन समोर आणून त्यामध्ये सुमारे १२ ते १५ कोटी रुपये वाढविण्याचा घाट रचला होता. जॅकवेलचे काम पाण्यात टिकेल असे भक्कम करणारे हे नवे डिझाईन असल्याचा प्रकार पुढे आणला आहे. त्यामुळे या जॅकवेलच्या खर्चाचा अतिरिक्त बोजा सोसायचा कोणी हा नव्याने प्रश्न उभारला होता. याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांसोबत चर्चा करून हे नवे डिझाईन दि. ९ जून २०१७ रोजीच महापालिकेने नाकारले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या परवडेल असे नवे डिझाईन तयार करण्याच्या सूचना युनिटीला दिल्या आहेत.युनिटी कन्सल्टंटने जॅकवेलच्या नव्या केलेल्या डिझाईनमध्ये आरसीसी वॉल आणि राफ्ट (फौंडेशन) यांच्यातच किमान १० कोटींची वाढ होत होती, तर त्याशिवाय स्टीलचेही दर वाढणार असल्याने जॅकवेलच्या नव्या डिझाईनमध्ये किमान १२ ते १५ कोटींची वाढ होणार होती, पणनवे डिझाईन नाकारल्याने महापालिकेवर अतिरिक्त पडणारा बोजा वाचला आहे.