शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

जाधव, आडनाईकांना करवीर-पन्हाळ्याचे ‘बळ’

By admin | Updated: July 18, 2015 00:19 IST

बाजार समिती निवडणूक : काँग्रेसचे घटलेले मतदान विचार करायला लावणारे

राजाराम लोंढे-कोल्हापूर -बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात शिवसेनेचे विजयी उमेदवार संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांना करवीर, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्याने बळ दिले. या तालुक्यातून जाधव यांना तब्बल ६०९ तर आडनाईक यांना ४३० चे मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय अधिक सोपा झाला. करवीरमधील ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे प्राबल्य असतानाही त्यांचे घटलेले मतदान विचार करायला लावणारे आहे. समितीसाठी पॅनेलची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांबरोबर उमेदवारही निवांत होते. विरोधी पक्षाचे स्वतंत्र पॅनेल झाले व विकास संस्थांसह ग्रामपंचायतींवरील प्राबल्य पाहता विजयासाठी फारसे झगडावे लागणार नव्हते. त्याचा प्रत्यय विकास संस्था गटात आला. या गटातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दोन हजारांपेक्षा अधिक फरकाने विजयी झाले; पण ग्रामपंचायत, अडते-व्यापारी गटात आघाडीचे उमेदवार चारी मुंड्या चित झाले. ग्रामपंचायत गटात शिवसेनेचे संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांनी मुसंडी मारत राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना धक्का दिला. पराभूत शहाजीराव वारके व विजय आबीटकर हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक आहेत. समितीच्या सत्तेवर जय-पराजयाचा काहीही परिणाम होत नसला, तरी के. पी. पाटील यांची तालुक्यातील राजकारणाच्या दृष्टीने हे घातक आहे. या उमेदवारांना मिळालेले मतदान पाहता बेरीज-वजाबाकीचे राजकारण लक्षात येते. जाधव व आडनाईक यांनी करवीर, पन्हाळा, शाहूवाडीत आघाडी घेतली तर वारके व आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड, कागल, गगनाबावड्यात मुसंडी मारली; पण मताधिक्य कमी होते. विजयाचा मार्ग सुकरकरवीर मध्ये बहुतांशी ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत; पण काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र इंजूळकर व सचिन घोरपडे यांना या तालुक्यातून १२०० पैकी २५० च्या आतच मते मिळाल्याने जाधव व आडनाईक यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू आहे. चंद्रदीप नरकेंचा आक्रमक प्रचार समितीच्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके ताकदीने उतरले होते. इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांनी आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवत वाड्या-वस्त्यांतील संस्थेपर्यंत पोहोचले. विकास संस्थेत आपले फारसे चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण ताकद ग्रामपंचायत गटात लावली. शेवटच्या टप्प्यात त्यांनी टाकलेले फासे यशस्वी झाल्यानेच जाधव व आडनाईक यांचा विजय सोपा झाला. तालुकानिहाय अशी मिळाली आघाडी :उमेदवाराचे नावकरवीरकागलपन्हाळाशाहूवाडीगगनबावडाभुदरगडराधानगरीसंजय जाधव (विजयी)३५०- १४३११६ - - -शहाजीराव वारके (पराभूत)- ४० - - ३ ११६ १५६ शशिकांत आडनाईक (विजयी)११४- २२४९२---विजय आबिटकर (पराभूत)-५३ - -१२१३९२१०