शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साडी वाटपाच्या विरोधात लंगोट वाटणे अशोभनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:30 IST

पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या साडी वाटपाच्या विरोधात कोल्हापुरात काही जणांनी लंगोट वाटपाचा प्रकार अशोभनीय आहे, अशा शब्दांत शहरातील तेरा तालीम संस्थांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे निषेध नोंदविला आहे.

ठळक मुद्देसाडी वाटपाच्या विरोधात लंगोट वाटणे अशोभनीयशहरातील विविध तालमींकडून निषेध

कोल्हापूर : पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या साडी वाटपाच्या विरोधात कोल्हापुरात काही जणांनी लंगोट वाटपाचा प्रकार अशोभनीय आहे, अशा शब्दांत शहरातील तेरा तालीम संस्थांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे निषेध नोंदविला आहे.प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राजर्षी शाहूंच्या विचाराने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची वाटचाल सुरू आहे. त्यांनी शहरातील अनेक तालीम संस्थांना आर्थिक साहाय्य करून नवीन इमारती बांधल्या. रेश्मा माने या खेळाडूला कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम बांधून दिली.

अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना खेळाचे साहित्य, वेपन्स, आंतरराष्ट्रीय  दर्जाचे कीट्स दिले आहेत. तसेच कै. पै. कंदुरकर यांच्या संपूर्ण दवाखान्याचा खर्च करून त्यांच्या पश्चात संपूर्ण कुटुंबीयांची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वीकारली आहे. त्याचबरोबर पै. गौरव रामाने (हिंगेवाडी, ता. राधानगरी), पै. तानाजी शिंदे (जत, जि. सांगली), पै. वैभव पाटील (रा. खानापूर, ता. भुदरगड) यांच्यासह अनेक पैलवानांचा खर्चही ते करत आहेत.

असे असताना त्यांच्यासारख्या व्यक्तीवर साडी वाटपाला विरोध म्हणून लंगोट वाटप करत आहेत. हे अशोभनीय आहे. असे कृत्य करणाऱ्या पैलवानाने आपण किती कुस्तीची मैदाने मारलीत? याचे उत्तर द्यावे. खरा पैलवान साडीच्या पदराआडून वार करत नाही.या पत्रकावर तटाकडील तालीमचे सचिव राजू जाधव, बाबूजमाल तालीमचे अध्यक्ष अमित चव्हाण, शाहू विजयी गंगावेस तालीमचे सचिव महेश चव्हाण, कै. नारायण मेढे तालीमचे अध्यक्ष किशोर पवार-मेढे, तुकाराम माळी तालीमचे अध्यक्ष शिवाजी पोवार, पाटाकडील तालीमचे अध्यक्ष सुभाष सरनाईक, सुबराव गवळी तालीमचे सचिव रमेश मोरे, वेताळ माळ तालीमचे अध्यक्ष अजित चव्हाण, नंगीवली तालीमचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, बालगोपाल तालीमचे अध्यक्ष निवास साळोखे, शिवाजी तालीमचे सचिव बाळासो बोंगाळे, उत्तरेश्वर तालीमचे सचिव विराज चिखलीकर, रंकाळावेश तालीमचे सचिव मुकुंद शिंदे, आदींच्या सह्या आहेत. 

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर