शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-‘आयसोलेशन’ कोरोना संशयितांसाठीच राखीव, मनपाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 15:21 IST

कोरोना विषाणूशी सामना करण्याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली असून आरोग्य विभागाने तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार यापुढे आयसोलेशन हॉस्पिटल केवळ कोरोना संशयितांसाठी राखीव ठेवण्यात आले. संशयित रुग्णांच्या शोधाकरिता शहरात तीन ठिकाणी स्क्रीनिंग करण्यात येईल, तसेच घरोघरी जाऊन शोध मोहीम तसेच प्रबोधन करण्याकरिता अकरा पथके स्थापन करण्यात आली.

ठळक मुद्दे‘आयसोलेशन’ कोरोना संशयितांसाठीच राखीव, मनपाचा निर्णय तीन ठिकाणी स्क्रीनिंग : सर्वेक्षणासाठी अकरा पथके

कोल्हापूर : कोरोना विषाणूशी सामना करण्याकरिता महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली असून आरोग्य विभागाने  तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार यापुढे आयसोलेशन हॉस्पिटल केवळ कोरोना संशयितांसाठी राखीव ठेवण्यात आले. संशयित रुग्णांच्या शोधाकरिता शहरात तीन ठिकाणी स्क्रीनिंग करण्यात येईल, तसेच घरोघरी जाऊन शोध मोहीम तसेच प्रबोधन करण्याकरिता अकरा पथके स्थापन करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये केवळ दहा खाटा कोरोना संशयितांसाठी उपलब्ध करून ठेवा असे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी या रुग्णालयातील कावीळ व गॅस्ट्रोचे सर्व रुग्ण सावित्रीबाई फुले रुग्णालयात स्थलांतर करून या ठिकाणी केवळ कोरोना संशयित रुग्णांनाच ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली.

तेथे प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्ग नियुक्त करण्यात आला असून, चोवीस तास सेवा देण्यात येईल. त्याच ठिकाणी एक विशेष कक्षही सुरू करण्यात आला आहे. आयसोलेशन हॉस्पिटलला आवश्यक मास्क, सलाईन, प्राथमिक औषधांचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. एक रूम खास रुग्णांच्या नातेवाईकांना कौन्सिलिंग करण्याकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.शिरोली नाका, शाहू नाका, शिये नाका या तीन ठिकाणी तपासणी पथके ठेवण्यात येत आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या या तीन महत्त्वाच्या रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात ही पथके शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी, विचारपूस (स्क्रीनिंग) करणार आहेत.

शहरात येणाऱ्या प्रवाशांपैकी कोणाला कोरोनासदृश लक्षणे आढळून आली तर त्याचे नाव, पत्ता, फोन नंबर, तो कोणाच्या संपर्कात आला होता, याची संपूर्ण माहिती लिहून घेतली जाईल. जर संशय अधिकच असेल तर त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात नेऊन दाखल केले जाणार आहे.शहरात महापालिकेची अकरा नागरी आरोग्य सुविधा केंद्रे असून, त्याअंतर्गत अकरा पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करायचे आहे. प्रत्येक घरात सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार असलेला कोणी रुग्ण आहे का, याची चौकशी केली जाणार आहे. त्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत.

जर असा आढळलाच तर त्यावर प्राथमिक उपचार केले जाणार आहेत. या पथकात वैद्यकीय अधिकारी, नर्स, कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ही पथके कोरोना विषाणूबाबत जनजागृती करतील. माहिती पत्रके वाटतील.डॉ. दिलीप पाटील पुन्हा रुजूचार दिवसांपूर्वी आरोग्याधिकारीपदाचा राजीनामा दिलेले डॉ. दिलीप पाटील पुन्हा रुजू झाले. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना कामावर रुजू होण्यासाठी विनंती केली होती. डॉ. पाटील हजर झाल्या झाल्या तीन निर्णय घेतले आणि यंत्रणाही कामाला लावली.

माणुसकीच्या भावनेने सेवा द्याकोरोनाचे संकट मोठे असल्याने यदाकदाचित आवश्यकता लागलीच तर शहरातील खासगी रुग्णालयातील डॉक्टर्सनी महापालिकेकडे दिवसातील काही तास माणुसकीच्या भावनेने सेवा द्यावी, अशी विनंती करणारे पत्र आपण सर्व रुग्णालयातील डॉक्टर्सना पाठवित आहे. तसेच वेगवेगळ्या असोसिएशनच्या अध्यक्ष व सचिवांनाही पत्र पाठवून त्यांना या कामात योगदान देण्याचे आवाहन करणार असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.

शहरातील बागा बंद‘कोरोना’चा संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जलतरण तलाव, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल बंद ठेवले आहेत. सोमवारी शहरातील सर्व बागाही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

टॅग्स :corona virusकोरोनाkolhapurकोल्हापूर