शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

राजेखान जमादारच संजय मंडलिकांना अडचणीत आणतायत का? मुश्रीफ गटाची विचारणा 

By विश्वास पाटील | Updated: September 14, 2023 14:31 IST

'त्या' कामाची मंजुरी मुश्रीफांच्या प्रयत्नामुळेच, विनाकारण आकांडतांडव कशासाठी? 

कोल्हापूर : शिवसेना- शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, मंडलिक गटाचे प्रमुख नेते, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे खासदार प्रा. संजय मंडलिक यांना ऐन खासदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत आणत आहेत की काय? असे प्रत्युत्तर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी दिले.

हणबरवाडी पूल-रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदाराची वर्क ऑर्डर का अडवून ठेवली आहे, ठेकेदाराला मुश्रीफ साहेबांना भेटायला का सांगत आहात, अशी प्रश्नांची सरबत्ती करत राजेखान जमादार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच जोरदार वाद घातला होता.यावर प्रत्युत्तर देताना युवराज पाटील व भैया माने म्हणाले, एका रस्त्याच्या कामाचा मुद्दा काढून त्यांनी जे नाट्य केले. ते करण्याची गरजच नव्हती. कारण; हे काम मंडलिक यांच्या पत्रावरून आहे की मुश्रीफ यांच्या पत्रावरून यामुळे हे काम अनेक दिवस थांबलेले. दरम्यान; कडगाव - बेकनाळ- बाळेघोल रस्त्यावरील पुलाचे काम नामदार हसन मुश्रीफ यांच्या मागणीनुसारच मंजूर झाले आहे. जमादार यांनी मंत्री मुश्रीफ यांना जरी विचारले असते किंवा आमच्याशी चर्चा केली असती तरी ही कृत्य त्यांना टाळता आले असते.पत्रकात पुढे म्हटले आहे, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास खाते होते, त्यावेळी खासदारांना निधी देण्याचे कोणतेही धोरण ठरलेले नव्हते. तरीसुद्धा मुश्रीफांनी मोठ्या मनाने खासदार मंडलिक यांना विकासकामांसाठी कोट्यावधीचा स्वतःचा निधी दिला. याबद्दल खासदार मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ यांचे जाहीर कार्यक्रमातून आभारही मानले आहे. एवढा निधी दिलेला असतानाही अवघ्या दीड कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी राजेखान जमादार एवढे अकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणा कशासाठी करीत आहेत? असा प्रश्नही केला.मंडलिक यांच्यावरती दबाव जमादार हे मुरगुड नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना त्यांच्याच गटातील नगरसेवकांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन रस्त्याच्या कंत्राटावरून फ्रीस्टाइल केलेली अनेक उदाहरणे आणि वर्तमानपत्रांमधून वाचलेली आहेत. तसेच; स्वतःचा गट निर्माण करून सातत्याने खासदार संजय मंडलिक यांच्यावरती दबाव वाढवत आहेत. याचे पडसादही भविष्यात दिसतीलच. खासदार मंडलिकांनी समज देण्याची गरज आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही वेळ सामंजस्याने वागण्याची आहे. एवढ्याशा साध्या गोष्टीसाठी त्यांनी केलेल्या आकांडतांडव आणि आक्रस्ताळेपणाबद्दल खासदार मंडलिक यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. मुश्रीफ यांनी हजारो कोटींचा निधी दिलेला आहे. त्यामुळे कंत्राटदारांबद्दलची त्यांची भूमिका सर्वांनाच माहीतही आहे.  एखादे काम का प्रलंबित आहे, याची माहिती मुश्रीफ  किंवा आम्हाला जरी त्यांनी सांगितले असते, तरीही हा प्रश्न निकालात निघाला असता.बजेट बुकचाच पुरावा मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये कडगांव- बेकनाळ- बाळेघोल या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ५४ वर हणबरवाडी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम हे काम नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मागणीनुसार मंजूर आहे. त्याचा हा घ्या बजेट बुकचाच पुरावा 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSanjay Mandalikसंजय मंडलिकHasan Mushrifहसन मुश्रीफ